ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे आज निधन.



ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे आज निधन.


एस.के.24 तास


मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीमधील ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका,लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे.त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांना कोरोना सोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती.त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली होती. परंतु आज पुन्हा त्यांची प्रकृती खवल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होत.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात झाला.त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्य कलावंत होते.लता मंगेशकर या सर्वात ज्येष्ठ अपत्य.आशा,उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !