मजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली संस्थेच्या वतीने तालुक्यातील जेप्रा व खरपुंडी या गावात राष्ट्रिय विज्ञान दिवस साजरा.

मजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली संस्थेच्या वतीने तालुक्यातील जेप्रा व खरपुंडी या गावात राष्ट्रिय विज्ञान दिवस साजरा.



एस.के.24 तास 



गडचिरोली : मजिक बस संस्थेचे वरिष्ठ  जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री.प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वय देवेंद्र हिरापुरे सर यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली तालुक्यातील खरपूंडी व जेप्रा येथे राष्ट्रिय विज्ञान दिवस विवीध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला यामध्ये . १) प्रश्न मंजुषा स्पर्धा व. २) विज्ञान प्रयोग प्रदर्शनी यामध्ये ८० विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला .


हा कार्यक्रम घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी व मुलांच्या वैज्ञानिक विचारांना चालना मिळावी आणि स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्याचा वैचारिक पाया मजबूत व्हावा. यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मा . श्री लेखराम हुलके सर तसेच कु. रिना बांगरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन . समुदाय समन्वय स्नेहा खोब्रागडे यांनी केलं.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !