पत्रकार संघाची जिल्हात "आरोग्य जनजागृती" प्रा.महेश पानसे विदर्भ अध्यक्षांचा वाढदिवस संपन्न.

पत्रकार संघाची जिल्हात "आरोग्य जनजागृती" प्रा.महेश पानसे विदर्भ अध्यक्षांचा वाढदिवस संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : संपुर्ण विदर्भात राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा,महेश पानसे यांचा वाढदिवस आरोग्य जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात आला.नागपूर शहरात गरजूंना ब्लॅन्केट वाटप व आरोग्य विषयक नियमावली समजावून वाढदिवस साजरा करण्यात आला.

वर्धा जिल्हयात रूगणांना शाल व आवश्यक वस्तू वाटप करून व माहिती देवून महेश पानसे यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले.

चंद्रपूर जिल्हात अनेक तालुक्यांमध्ये रूग्णांना शाल,फळे व प़ाथमिक सुविधा पुरवून व आरोग्य जनजागृती करून राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी अभिष्टचिंतन केले.

चिमूर तालुक्यात विभागीय उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,तालुका अध्यक्ष केवलसिंह जूनी यांनी पुढाकार घेतला.नागभिड तालुक्यात नवेगाव पांडव येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. चाकाेले, सरपंचा सौ.अँड.शमिंला रामटेके यांचे मार्गदर्शन व उपस्थितीत केक कापून,जनजागृती व फळेवाटप करून तालुका अध्यक्ष,सुधाकर श्रीरामे यांचे पुढाकारात वाढदिवस साजरा करण्यात आला.


तळोधी येथे शाशकिय रुगणालयात पत्रकार संघ अध्यक्ष संजय अगळे व पदाधिकारी यांनी जनजागृती पर कार्यक्रम साजरा केला.

मूल येथे प्रा,महेश पानसे यांचे उपस्थितीत उपजिल्हा रुगणालयात रूग्ण सेवा देऊन सवं तालुका संघाने केक कापून अभिष्टचिंतन केले.

बल्लारपूर तालूका संघाने तालुका अध्यक्ष श्री.दोतपल्ली,मुन्ना खेडकर यांचे मागंदशंनात जनजागृती व पळे,बिस्किट वाटप करण्यात आले.

गोंडपिपरी येथे तालुका अध्यक्ष वेदांत मेहरकुले,वरोरा येथे तालुका अध्यक्ष बालूभाऊ भोयर,ब़म्हपूरी येथे तालुकाध्यक्ष डॉ. प़ा.रवी रणदिवे,सचिव नंदु गुडडेवार यांचे नेतृत्वात मोठया संख्येत मास्क वितरण करण्यात आले.गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रुपराज वाकोडे,भंडारा जिल्हाध्यक्ष सदाशिव ढेंगे,वधॉ जिल्हाध्यक्ष प़मोद  पानबुडे,नागपूर जिल्हाध्यक्ष प़दिप शेंडे यांनीचंद़पूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बोकडे यांनी विदर्भ अध्यक्ष प़ा. महेश पानसे यांचे वाढदिवस आरोग्य जनजागृती दिन म्हणून साजरा करण्याकरीता पुढाकार घेतला होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !