पत्रकारितेचा सन्मान हे सौभाग्याचे कायं. - अँड,शमिंला रामटेके★ महेश पानसे यांचा वाढदिवस आरोग्य जनजागृती ने संपन्न.

पत्रकारितेचा सन्मान  हे सौभाग्याचे कायं. - अँड,शमिंला रामटेके

★ महेश पानसे यांचा वाढदिवस आरोग्य जनजागृती ने संपन्न.


एस.के.24 तास


नागभिड : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष,जेष्ट पत्रकार,राज्य पुरस्कार,जिवन गौरव पुरस्कार प्राप्त प्रा महेश पानसे यांचा वाढदिवस त्यांचे मुळगावी नवेगाव पांडव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्य पत्रकार संघ व ग़ामपंचायत यांचे वतीने साजरा करण्यात आला.महेश पानसे यांचे रूपाने गावाची वेगळी ओळख राज्यात झाली असून आज त्याचे वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाचे सौभाग्य गावास लाभले असे उदगार याप़संगी नवेगाव पांडव च्या सरपंचा अँड. सौ.रामटेके यानी व्यक्त केले.


कार्यक्रमाला गावचे सरपंच,अँड सौ.शर्मिला मॅडम,वैद्यकीय अधिकारी डॉ,आकाश चाकोले,प़ा.महेश पानसे यांचे वडील रघुनाथ जी पानसे, रामटेके साहेब उपस्थित होते.


नवेगाव पांडव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रा महेश पानसे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थितांनी हार्दिक शुभेच्छा देताना सांगितले की पानसे सर हे पत्रकार संघाच्या राज्यातील सवॉत माेठया संघटनेचे विदर्भ अध्यक्ष आहेत. 


आपल्या पत्रकारितेचा व गावाचा अभिमान बाळगून गावाचा विकास साधणारा महामेरू झाले आहेत. जे आम्ही करू शकत नाही ते करण्यासाठी भाग पाडणारे आहेत. त्यामुळे होणारा वाढदिवस ही माझ्यासाठी  व गावासाठी मोठी पर्वणी आहे असे वाटते.

वैद्यकीय अधिकारी डॉ,आकाश चकोले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्यापासून सेवा देणे हे माझे कर्तव्य असून शासनाच्या धोरणाचा डोलारा पुढे जात असताना कोणतीही आडकाठी आणू नये.पत्रकारांनी बातमी देताना सत्य काय आहे ? त्याची चौकशी करून बातमी प्रकाशित करावी व महेश पानसे यांचे कार्याचा आदर्श ठेवावा असे ते सांगितले.

मी जिथे सेवा देतोक्ष तेथील सुपुत्र विदर्भाचा ज्येष्ठ पत्रकार, प्रा महेश पानसे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील वाटचाल यशस्वी होण्याकरिता शुभेच्या देत आहे.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागभिड येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, सुधाकर श्रीरामे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय रामटेके यांनी केले.यावेळी रघुनाथ जी पानसे सर यांच्या वडिलांनी केक कापून शुभेच्या दिल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण आणि उपस्थितांना केळी,बिस्किटे वाटप करण्यात आले,प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी बांधव सहभागी झाले होते व ग्रामस्थ उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !