सावली पंचायत समितीत महा आवास अभियान कार्यशाळा संपन्न - पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

सावली पंचायत समितीत महा आवास अभियान कार्यशाळा संपन्न - पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास


सावली - सावली पंचायत समिती येथे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली महा आवास अभियान कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेत ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या सोडवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार,गरजू लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.यशवंतराव चव्हाण घरकुल, धनगर घरकुल योजना सावली तालुक्यात राबविणार.नव्यानेच ओबीसी गरीब कुटुंबासाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना आणणार असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. 

पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील 'ड' यादीत येत असलेल्या अडचणी अवगत करून दिले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,माजी जि.प उपाध्यक्ष संदीप गडमवार,माजी जिप बांधकाम सभापती दिनेश चिटनूरवार, सावली नगरपंचायत अध्यक्षालता लाकडे, पंचायत समिती सदस्या, उर्मिला तरारे,मनीषा जवादे,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार उपस्थित होते.कार्यशाळेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी सुनीता मरसकोले तर संचालन विस्तार अधिकारी परसवार यांनी केले.कार्यशाळेला सरपंच,ग्रामसेवक,तलाठी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !