आर्मी जवानाच्या मृत्यू ने परिसरात हळहळ व्यक्त.

आर्मी जवानाच्या मृत्यू ने परिसरात हळहळ व्यक्त.


नितेश मँकलवार ! उपसंपादक ! एस.के.24 तास


मुल : तालुक्यातील टेकाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला सादागड येथील आशिष जनार्दन मंगाम वय,27 वर्ष या आर्मीतील युवा जवानाचे नुकतेच निधन झाले अशी च्या पोटात दुखत असल्याची माहिती आर्मी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आशिष च्या परिवाराला दिली होती. त्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

अतिशय होतकरु व खेळात तरबेज असलेला आशिष जनार्दन मंगाम यांची 2014 मध्ये झालेल्या आर्मी च्या सैनिक पदावर निवड झाली होती.तो त्या तिघांनी खेळासाठी प्रसिद्ध होता दिल्लीमध्ये आर्मीत सेवा देत असताना मेरठ येथे आलेला होता दरम्यान त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याला तेथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आल्याची माहिती परिवारा देण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती परिवाराला देण्यात आली आहे आशिष चे प्राथमिक शिक्षण मुल तालुक्यातील टेकाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण सावली येथे झाल्याचे सांगण्यात आले.


 सदर युवा जवान हा अविवाहित असून त्याच्या मागे आई-वडील भाऊ आणि बराच आप्त परिवार आहे युवा सैनिकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !