मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने मुल तालुक्यातील विविध गावात शिवजयंती साजरी.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने मुल तालुक्यातील विविध गावात शिवजयंती साजरी.


राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास


मुल : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री.प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु.निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व मुल येथील शाळा मधील  मूल  तालुक्यात  "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. 

उपक्रमाचे विषेश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे,माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व मुलींचे लग्नाचे वय वाढविणे अशा हेतूने मॅजिक बस संस्था चंद्रपूर जिल्ह्यात काम करीत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना तसेच त्यांच्या कार्याची ज्योत आपल्या मनात सतत तेवत राहावी यासाठी विविध गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून मिरवणूक काढली,गीत गायन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर  मुलांनी तसेच शिक्षक आणि सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुशी,खालवसपेठ,दाबगाव,सिंथाला,येथील प्रत्येक शाळेत असणारे मंत्रिमंडळनी  कार्यक्रमाची आखणी केली,कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक, आणि मार्गदर्शन हे सर्व मुलांचे शाळा पातळीवर असणाऱ्या मंत्रीमंडळाने केले  त्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम  पार पडला. तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तेथील समुदाय समन्वयक संबोधी गेडाम,प्राची भूर्से, धनश्री शेंडे,  दामिनी बुरांडे आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे शाळा सहाय्यक अधिकारी संदेश रामटेके यांनी परिश्रम घेतले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !