नातवाने केली आजोबाची हत्या ; सिंदेवाही पोलिसांनी रहस्यमय हत्येचे गुड उघडण्या मध्ये मिळविले यश

नातवाने केली आजोबाची हत्या ; सिंदेवाही पोलिसांनी रहस्यमय हत्येचे गुड उघडण्या मध्ये मिळविले यश


एस.के.24 तास


सिंदेवाही : दिनांक 22/02/2022 रोजी फिर्यादी महिला नामे,मंदा सुधाकर शेलकर यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्यामध्ये येऊन माहिती दिली की तिचे वडील नामे कवडु सुदाम देठे वय 75 वर्ष राहणार लाडबोरी हे घरी दिसून येत नाही व फिर्यादी महिलेच्या मुलगा आरोपी नामे,सुरज सुधाकर शेलकर वय 24 वर्षे यानेच त्यांच्या जिवाचे काहीतरी बरेवाईट केले असल्याचा तिला संशय येत आहे व त्यांना मारून मृत शरीराची देखील त्याने विल्हेवाट लावली असल्याचा सदर महिलेला संशय येत होता.


      सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे,पी.एस.आय नेरकर व पोलीस पथक यांनी घटनास्थळ गाठून तपासाची चक्रे वेगाने फिरविली.आरोपी हा घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीतच असताना सर्वप्रथम त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने कोणतीही माहिती देण्यास सहकार्य न करता टाळाटाळ करुन पोलिसांची दिशाभूल करू लागला होता.


      आरोपीचे हावभाव पाहता ते संशयास्पद वाटू लागल्याने सर्वप्रथम आरोपी राहत असलेल्या मृतकाच्या घराची कसून घर झडती घेण्यात आली. घराचे बाहेर जळणासाठी ठेवलेल्या लाकडांच्या ढिगा खाली माती उकरलेली दिसून आली. त्यावरून पोलिसांना संशय आल्याने सदर ठिकाणची माती थ बाजूला केली असता त्या ठिकाणी उग्र वास येऊ लागला. सदर ठिकाणी मृतकाला मारून त्याचा मृतदेह पुरला असल्याची पोलिसांना दाट शक्यता वाटू लागल्याने घटनास्थळी तात्काळ माननीय एस.डी.पी.ओ.ब्रह्मपुरी श्री मिलिंद शिंदे, तहसीलदार श्री गणेश जगदाळे, सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री.झाडे तसेच व्हिडिओ कॅमेरा असे सर्व टीम घटनास्थळी पाचारण करून नमूद जागेचे माती पूर्ण बाजूला काढली असता सदर ठिकाणी मृतक नामे कवडु सुदाम देठे यांचे मृतदेह मिळून आला त्यावरून आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे व मृतक यांना ज्या कुराडीने डोक्यात घालून जीवे ठार मारले ती कुऱ्हाड देखील आरोपीने पोलिसांच्या स्वाधीन केलेली आहे. तसेच मृतक यांना सोने व पैशाच्या हव्यासापोटी ठार मारून दीड महिन्यापूर्वी जमिनीत पुरलेले असल्याचे धक्कादायक माहिती आरोपीने दिलेली आहे. आरोपीस अटक करण्यात आलेली असून त्याचे विरोधात खून करून कोणाचा पुरावा नष्ट करणे याबाबत गुन्हा नोंद करून त्याला आज रोजी न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहेत. पोलिसांनी केवळ संशयाच्या जोरावर सदरचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे नागरिकांकडून सिंदेवाही पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !