सुरक्षा रक्षकाने डोक्यात गोळी घालून केली आत्महत्या.

सुरक्षा रक्षकाने डोक्यात गोळी घालून केली आत्महत्या.


एस.के.24 तास


गडचिरोली : अहेरी विधानसभेचे आमदार बाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 20 फेब्रुवारी 2022 ला रात्रौ,8.00 वा.घडली.


प्रमोद शेकोकर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.अहेरी येथील पावर हाउस कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये रात्रौ 8.00 आठ वाजताच्या दरम्यान स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली.मृतक पोलीस शिपायाची पत्नी पोलीस मदत केंद्र ताळगाव येथे कार्यरत आहे.


घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर,पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे,यांनी घटनास्थळी धाव घेतली नेमकी आत्महत्या कशामुळे केली हे अद्याप कळलेले नाही. पुढील तपास पोलीस स्टेशन करीत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !