दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या चेतन भारत वाळके याला सी.डी.सी.सी. बँकेकडून आर्थिक मदत.

दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या चेतन भारत वाळके याला सी.डी.सी.सी. बँकेकडून आर्थिक मदत.


राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास


मुल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या नफ्यातून केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकरी व त्यांचे कुटुंबाचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना हिंमत देणे हेच सी.डी.सी. सी.बँकेचे कर्तव्य समजून बँकेचे अध्यक्ष,संतोषसिंग रावत यांनी बेंबाळ येथील चेतन भारत वाळके याला दुर्धर आजार झाल्याने सी.डी.सी.सी बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधुन मदतीचा चेक चेतन वाळके या रुग्णाला उपचारासाठी बँकेचे अध्यक्ष, संतोषसिंग रावत यांच्या हस्ते देण्यात आला.


या प्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर,तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष,राकेश रत्नावार ग्रामीण काँग्रेस नेते,दीपक पाटील वाढई बेंबाळ सरपंच,करुणाताई उराडे पंचायत समिती माजी उपसभापती,दशरथ वाकुडकर नांदगाव,सरपंच हिमानी वाकुडकर, सामाजिक कार्यकर्ते,गुरु गुरुनूले,युवक काँग्रेस अध्यक्ष,पवन नीलमवार,नितीन मोहूले, चांगदेव केमेकार,इस्तारी चिल्लरवार,किशोर पगडपल्लीवार, त्रिमूर्ती नाहगमकर,दामोदर देशमुख यांच्यासह बेंबाळ येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मदतीची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकर्‍यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक असल्याने बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, संतोषसिंग रावत यांनी बँकेच्या सूत्र हाती घेतल्याबरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक बदल केले त्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी एकमेव बँक म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या बँकेला मिळालेल्या आर्थिक त्यातून धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजार झाल्याने  शेतकऱ्याच्या घरी जाऊन तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत देऊन रुग्णाला व त्यांच्या कुटुंबांना पुनर्जीवित करण्याचे कार्य करीत असल्याने शेतकरी व कुटुंबीयांनी संतोषसिंग रावत व बँकेचे आणि समस्त संचालक मंडळाचे बेंबाळ वासीयांनीयांनी आभार मानले आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !