आशा वर्करच्या मुलाची गगन भरारी ; डॉक्टर बनण्याचे स्वप्न केले पूर्ण.

आशा वर्करच्या मुलाची गगन भरारी ; डॉक्टर बनण्याचे स्वप्न केले पूर्ण.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास


चंद्रपूर : जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चांदापूर येथील आशा वर्करचा मुलगा गौरव मुन्नाजी मर्लेवार याने NEET परीक्षेत घवघवीत यश मिळवले.गौरव मुन्नाजी मर्लेवार याने GMC नांदेड या वैद्यकीय महाविद्यालयात  MBBS या शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे.गौरव च्या यशाबद्दल समाजबांधव,ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले . गौरवला आनंद देणारा हा निकाल दिनांक 31 जानेवारी  2022 रोजी जाहीर झाला.मेडिकल च्या पहिल्याच फेरीत यांनी हे यश संपादन केले आहे. 


 मूल तालुक्यातील चांदापूर  या गावात राहणाऱ्या गौरव ने प्रतिकूल  परिस्थितीतून हे यश प्राप्त केले . त्यामुळे त्याच्या यशाचे गावस्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे. गौरव चे वडिल शेतकरी असून  आई वनिता या गावातील आरोग्य उपकेंद्रात आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात तर गावातच असलेल्या शेतीत राबून वडीलही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावतात.आपल्या मुलाने शिकून सवरून मोठं व्हावं हेच ध्येय या माता- पित्याने  बाळगलं होत.त्यामुळेच  आपल्या दैनंदिन परिस्थिती चा सामना करतांनाही या आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधीही मागे-पुढे पाहिलं नाही.गौरव लहानपणापासूनच शाळेत हुशार विद्यार्थी राहिला आहे.गौरव ने मूल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चांदापूर येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले . NEET परीक्षेत जिद्दीने यश मिळवले.


विशेष म्हणजे गौरव हा  जिल्ह्यातील शेळ्या मेंढ्या पाळण्याचा पारंपरिक व्यवसाय असणाऱ्या कुरमार समाजातील विद्यार्थी आहे.हा समाज आज शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात प्रगती चे पाऊल टाकत आहे .  गौरव  शिक्षण पूर्ण करून समाजातील पहिला MBBS डॉक्टर बनेल अशी समाजाची आशा आहे.गौरव ने म्हटले आहे की,परीक्षेत यश मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी.तसेच अभ्यासात सातत्य ठेऊन चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल. यशाचे श्रेय आई वडील व शिक्षक यांना दिले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !