सावली पोलिसांची अवैध कोंबडा बाजारावर धाड चार आरोपीना अटक.

सावली पोलिसांची अवैध कोंबडा बाजारावर धाड चार आरोपीना अटक.


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील व्याहाड खुर्द शेत शिवार गोसेखुर्द कँनल च्या बाजूला अवैध कोंबडा बाजार भागात भरून त्यावर पैशाचा जुगार लावत असल्याची माहिती मिळालेल्या पोलीस स्टेशन सावलीच्या पथकाने घटनास्थळावर लपतछपत जाऊन धाड टाकली असता एकूण चार आरोपी कोंबडा लढाईवर जुगार खेळताना मिळून आले.


 आरोपी,भगवान ऋषीजी आभारे,व्याहाड खुर्द,सुहास लहाणू दंडीकवार,रा.सावली,ज्ञानेश्वर उर्फ बच्ची सुखदेव गेडाम,व्याहाड खुर्द,ग जयेंद्र जयराम शेंडे रा,मोखाडा असे आरोपीचे नाव असून त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


 सदर गुन्ह्यात कोंबडा जुगारातील पाच जखमी कोंबडे त्यांच्या लढाई साठी वापरण्यात येणाऱ्या,लोखंडी कात्या,मोबाईल फोन,व नगदी  एकूण 27 हजार 980 रुपये चा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला.


 सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी श्री,मल्लिकार्जुन इंगळे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर,पोलीस उपनिरीक्षक चिचघरे,पोहेका, कोंडबत्तुंवार,दुर्गे, पोशी,श्रीकांत वाढई,दीपक चव्हाण यांनी केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !