भारतरत्न व गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे उद्या 7 तारखेला. ★ सोमवारी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर.

भारतरत्न व गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे उद्या 7 तारखेला.


★ सोमवारी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर.      


एस.के.24 तास

                            

मुंबई : दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनीही लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.दरम्यान, देशात दोन दिवसांचा राष्टीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारनेही सोमवार म्हणजे उद्या ( ता. ७) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटलंय, आज रविवार (ता. ६) भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी,अधिनियम, १८८१ (सन १९८१चाअधिनियम २६) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपवण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार (ता. ७) फेब्रुवारीला राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.दरम्यान,लता मंगेशकर यांचं आज मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं, त्या ९२ वर्षांच्या होत्या. हिंदीसह ३६ हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. आज संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या प्रभूकुंज निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलं आहे.हे कार्यालय राहतील बंद : राज्य सरकारचे सर्व कार्यालय, तसेच केंद्र सरकार द्वारे महाराष्ट्र राज्यात चालवले जाणारे सर्व कार्यालय ( जसे पोस्ट ऑफिस, बँक ) इ. उद्या 7 फेब्रुवारी रोजी बंद राहतील. तसेच राज्यातील सर्व न्यायालय देखील उद्या बंद ठेवण्यासंबंधी सूचना राज्य सरकारद्वारे महाप्रबंधक उच्च न्यायालय मुंबई यांना देण्यात आले आहे. इमर्जन्सी सुविधा या सुरूच राहतील.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !