मादी बिबट्याने 36 कोंबड्या व गावठी कुत्र्याला ठार मारले. ★ खैरी पट्टी घटना फटाके फोडून लावले हुसकावून.

मादी बिबट्याने 36 कोंबड्या व गावठी कुत्र्याला ठार मारले.


★ खैरी पट्टी घटना फटाके फोडून लावले हुसकावून.


एस.के.24 तास


लाखांदूर : लाखांदूर तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरूच असून ब छड्या सह बिबट्याने 36 कोंबड्या व एका गावठी कुत्र्याला ठार मारल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील खैरी पट येथे बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गावकऱ्यांनी फटाके फोडून बिबट व तिच्या दोन बछड्यांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला.

खैरी पट येतील शेतकरी शुभम भागडकर राकेश  दोनाडकर यांच्या गावाजवळ स्मशानभूमी लगत जनावराचा कोठा आहे बुधवारी रात्री ते नेहमीप्रमाणे गोठ्यात दूध काढायला गेले होते. दूध काढत असताना तेथे अचानक मादी बिबट्या तिच्या दोन बछड्यासह आली .त्याला पाहताच या दोघांनी शेजारील एका झोपडीत आश्रय घेत दार बंद करून घेतले.


मात्र बिबट्याने गोठ्यातील 36 कोंबड्या व 1 गावठी कुत्र्याला ठार मारले. या प्रकाराची माहिती मोबाईल वरून गावकऱ्यांनी दिली. गावकरी धावून आले फटाके फोडून बिबट्याला  हुसकावून लावले. मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित   यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक,जी.डी. हस्ते एस.जी.खंडागळे .मेश्राम वनमजूर विकास भुते घटनास्थळी पोहोचले दिसून आले.बिबट्याचे पग मार्क  दिसून आले.


वन्य प्राण्यांचा घुमाकुळ : - लाखांदूर तालुक्यात महिना भरापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून 15 दिवसापूर्वी दहेगाव जंगलात सरपन आणण्यासाठी गेलेल्या लाखांदूर येथील प्रमोद चौधरी यांना बिबट्यांनी ठार मारले होते. तर सरांडी येथे रानडुकराच्या भरवस्तीत शिरून एका बालकाला गंभीर जखमी केले होते. तर शेत गत आठवड्यात शेतात भगव्याचे दर्शन झाले होते. या प्रकारामुळे तालुक्‍यातील भितीचे वातावरण पसरले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !