मौजा अंतरगाव येथे दिनांक 26/2/2022 ला भव्य विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

मौजा अंतरगाव येथे दिनांक 26/2/2022 ला भव्य विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.


★ नागरिकांनी लाभ घेण्याचे सावली तालुका काँग्रेसचे आवाहन.


एस.के.24 तास


सावली : राज्याचे बहुजन कल्याण,मदत व पुर्वसन,आपत्ती व्यवस्थापन तथा चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयतांनाने व सौजण्यानेसावली तालुक्यातील मौजा अंतरगाव येथे दिनांक 26 फरवरी 2022 ला भव्य विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम येथील नामांकित डॉ. शुक्ला यांच्या माध्यमातून व त्याच्या टीमच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत सदर शिबिराची वेळ ही सकाळी 11 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. रुग्नानी शिबिराला येतांना आधारकार्ड व रेशनकार्ड ची प्रमाणित प्रत आणावी निवड झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया ही कस्तुरबा गांधी मेडिकल कॉलेज सेवाग्राम येथे करण्यात येणार असून रुग्णांना जाणे येणे करण्यासाठी मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,नितीन गोहणे यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !