चंद्रपुरात 16 वर्षीय 'राज' ला बिबट्याने उचलून नेले.
एस.के.24 तास
चंद्रपूर : काल रात्री भोजराज मेश्राम यांना वाघाने ठार केले होते, सदर घटनेनंतर राजकीय पक्षांनी वीज केंद्र व वनविभागावर ताशेरे ओढले. सदर घटना ताजी असताना पुन्हा दुर्गापूर नेरी येथे राहणारा १६ वर्षीय मुलगा राज भडके याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
दुर्गापूर ग्रामपंचायत च्या मागील भागांत राज हा जात असताना अचानक बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला,घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस व वनविभागाच्या चमूने शोधकार्य सुरू केले आहे.
वन विभागाच्या ढिसाळ नियोजना विरोधात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
वन विभागाच्या ढिसाळ नियोजना विरोधात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.