भामरागड तालुक्यात कलापथक च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती.



भामरागड तालुक्यात कलापथक च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती.


एस.के.24 तास


भामरागड : जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांचे वतीने सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा वार्षिक योजनांची माहिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्षितिजापरी बहुद्देशिय संस्था,आष्टी,ता.चामोर्शी जि.गडचिरोली यांनी कोविड लसीकरण,अनुसूचित जातीच्या विविध योजनांची कलापथकाद्वारे जनजागृती पर कार्यक्रम सादर करत नागरिकांना कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देऊन भामरागड तालुक्यातील ताडगांव,धोडराम,मन्ने राजाराम,बामणपल्ली,येचली,चिचोडा,हेमलकसा,मेडपल्ली येथे शासनाच्या विविध योजनांची माहितीत्या मध्ये कोविड लसीकरण व समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती करिता राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली.

लोककलावंत संस्थापक,संतोष सोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगल राजे मशाखेत्री,मंगेश कस्तुरे,शुभम गुरनुले,राहुल चिताडे, विठ्ठल बोरकुटे, सचिन कडस्कर,सोनाली पुसाम, प्रणाली जिवने आदी कलावंतांनी क्षितिजापरी संचाने गीत,नाट्य, संवाद कलापथक कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देत जनजागृती केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !