मुल शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील शेकडो बांधवाचा व महिला भगिनींचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश.

मुल शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील  शेकडो बांधवाचा व महिला भगिनींचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये  जाहीररित्या प्रवेश.

    

एस.के.24 तास


मुल : आज दी. 31.01.2022 रोज सोमवार ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात बैठक घेण्यात आली! या बैठकीत वॉर्डातील बहुसंख्य बांधवांनी व महिला भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

 सदर बैठकित प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका अध्यक्ष किसनराव वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे,तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, हेमंत सुपणार, प्रा.प्रभाकर धोटे उपस्थित होते.  सुनील कुकुडकर व प्रदीप देशमुख ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक १४ परिसर येथील बहुसंख्य नागरिकांची बैठक घेण्यात आली  .  सदर बैठकी मध्ये वार्डातील शेकडो च्या संख्येने  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला. 


          सदर बैठकीत शुभम महाडोळे, मायाताई आत्राम, जिजाबाई धारणे, नीलिमा सोनकर,भावना कुकुडकर,प्राची कुकुडकर,वैशाली टेकाम, पारुबाई वाघ, सरस्वती शेंडे, कौसल्याबाई चौधरी, रुपाली मेश्राम, नीरजा वाघ, गंगा मोहूर्ले, वैशाली कुळमेथे, रंजना श्रीरांमे, वर्षा नन्नावार, उषा गुरूनुले, कल्पना गोडसेलवार, माया महाडोले, सारिका ठाकरे, लता मोहुर्ले, रीना गुरूनुले, कविता मडावी, आशा शेंडे, जाईबाई शेंडे, सरस्वती शेंडे, सविता मडावी, राजू शेंडे, अनु शेंडे, गोविंदा शेडमके, राजू मेश्राम, नितेश कावळे, देवा गोडशेलवार, गुड्डू नभावर, शाम भोयर, नरेश कुकुडकर, अंकित श्रीरामे, विश्वनाथ  श्रीरामे, विजय निकोडे, वासुदेव शेंडे, लता शेंडे, तुषार शेंडे, कविता शेंडे, सुरेश गुज्जनवार, शालू गुज्जनवार, दादाजी गुज्जनवार, देविदास मडावी, चिरकुटा गुरूनुले, पुरुषोत्तम मेश्राम, रवी वाघ,अशोक कावळे, सागर नंदानी,विजय नंदानी, किशोर मोहूर्ले, प्रभाकर मोहूर्ले,मधुकर मोहूर्ले  आदी बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला !

    युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावेत व आम्ही सारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू  व समोर येणाऱ्या नगरपालिका निवडणूका  सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी दिले!

 तसेच  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धेय्य धोरण या बाबत वासाडे सर यांनी मार्गदर्शन केले. व राष्ट्रवादी पक्ष कसा वाढेल व प्रत्येक नागरिका पर्यंत विकास कामे पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करुन जनतेची मने जिंकुन दाखवु असे मार्गदर्शन शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे यांनी केले.

 सदर बैठक यशस्वी होण्याकरिता सुनील कुकुडकर,शहर सचिव प्रदीप देशमुख,सतीश गुरूनुले,कृष्णा वाढई आदींनी परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कुकुडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश जेंगठे यांनी केले.

     

         

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !