चार वर्षापासून बंद पडलेल्या हातपम्पाकडे स्थानीक प्रशासनाचे दुर्लक्ष. ★ जाब ( बुज ) येथील प्रकार,परिसरात पाण्याची मोठी समस्या. ★ पण्यासाठी महिलाचा आदोलनाचा इशारा.



चार वर्षापासून बंद पडलेल्या हातपम्पाकडे स्थानीक प्रशासनाचे दुर्लक्ष.


★ जाब ( बुज ) येथील प्रकार,परिसरात पाण्याची मोठी समस्या. 


★ पण्यासाठी महिलाचा आदोलनाचा इशारा.

 

लोकमत दुधे : एस.के.24 तास 


सावली : तालुक्यातील जांब (बुज) ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषद शाळे लगत श्री. मारोती उंदिरवाडे यांच्या घराशेजारील हातपंप मागील चार वर्षापासून कायमस्वरूपी बंद पडलेला आहे. सविस्तर माहिती याप्रमाणे की, गावातील लोकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय बघून  जांब (बुज) गावातील पहिला हातपंप श्री.मारोती उंदिरवाडे यांच्या घराशेजारी इ.स.1980 मध्ये ह्या हातपंपाची निर्मिती करण्यात आली होती. हातपंप 30 वर्षांपासून नियमितपणे सुरू होता. पण जि. प. शाळा जांब (बुज) शाळेतील शिक्षकांनी त्या हातपंपामध्ये पाईप टाकून शाळेमध्ये मोटरद्वारे पाणी भरणे सुरू केले. पण एका महिनाभरात हातपंपामध्ये बिघाड झाला. हातपंप परत सुरू करावा म्हणून परीसरातील लोकांनी ग्राम पंचायत मध्ये जाऊन तक्रार केली तेव्हा तत्कालीन सरपंच यांनी जि.प.शाळेने हातपंपामध्ये टाकलेले मोटरचे पाईस जे.सी.बी. च्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला.पण पाईप गंजलेले असल्यामुळे पाईप हातपंपामध्येच तुटून पडले.आणि हातपंप निकामी होऊन कायमस्वरूपी बंद पडला.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन नागरिकांनी हातपंप दुरुस्तीची वेळोवेळी मागणी केली असता ग्रामसेवक, तत्कालीन सरपंच, उपसरपंच यांनी हातपंपाची दुरुस्ती आज करू  उद्या करू किंवा नवीन हातपंप तयार करुन देऊ अशी पोकळ आश्वासन देत राहिले. पण तत्कालीन सरपंच यांचा कार्यकाल संपून गेला तरीही हातपंप दुरुस्ती केले गेले नाही. आजही ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन तक्रार केली जाते. तेव्हा तेव्हा ग्रामसेवक हो  हो म्हणत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या परिसरातील लोकांना पाण्यासाठी दुसऱ्या परिसरात जाऊन पाणी आणावे लागते आहे. ग्रामपंचायतच्या नवीन सदस्यांना माहिती देऊनही तेही सदस्य त्याकडे कानाडोळा करीत आहेत.निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे असताना आश्वासनाची बरसात करतात. पण सत्तेच्या खुर्चीवर बसले की,त्यांना सर्व गोष्टींचा विसर पडतो. लोकांना दिलेले आश्वासन पुर्ण करता येत नाही. परिसरातील महिलांची पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती सुरू आहे. दुसऱ्या चौकातील हातपंपाचे पाणी आणायला गेले असता. तिथे नंबर लावून अर्धा/अर्धा तास उभं राहून पाणी भरावे लागते आहे. हातपंप चार वर्षापासून कायमस्वरूपी बंद पडलेला आहे.तरी ग्रामपंचायत प्रशासन मूग गिळून गप्प का ! बसलेला आहे. हेच कळेनासं झालेलं आहे. जांब (बुज) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री.भांडेकर हे वेळोवेळी  हो ला हो लावत हात वर करत आहेत.परिसरातील महिला सावली पंचायत समिती कार्यालयात जाऊन हातपंपाबद्दल तक्रार दाखल करतो म्हटले तर ग्रामसेवक बोलतात की, ह्या हातपंपाचं काम मी करुन देतो. पण कोणत्याच महिलानी पंचायत समिती कार्यालयात जाऊन तक्रार देऊ नये  असे सांगून ग्रामसेवक वेळोवेळी महिलांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे परिसरातील महिलांनी येत्या दोन चार दिवसामध्ये पंचायत समिती कार्यालय सावली येथे मोर्चा काढायची तयारी दर्शविली आहे. २५०० लोकसंख्या असलेल्या जांब (बुज) गावामध्ये ७ हातपंप,  तीन विहिरी आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !