पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीला केले ठार,भंगाराम तळोदी येथील घटना.



पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीला केले ठार,भंगाराम तळोदी येथील घटना.


एस.के.24 तास


गोंडपिपरी : काल शनिवारी रात्री पत्नीला कुर्‍हाडीने मारून जागीच ठार केले.गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार पती-पत्नीत वाद निर्माण होऊन कडाक्याचे भांडण झाले. पत्नीला विद्युत शाँक मारण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर कुर्‍हाडीने वार करून जागीच ठार केले. ही घटना घडल्यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपी राजू बावणे वय,42 वर्ष याला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले. मृतक योगिता राजू बावणे वय,35 वर्ष यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी ते पाठवले असून ठाणेदार,जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू गोंडपीपरी पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !