मारोडा येथिल विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे मेंदूज्वर लसीकरणाचा शुभारंभ.


 मारोडा येथिल विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय  येथे मेंदूज्वर लसीकरणाचा शुभारंभ.


एस.के.24 तास


मुल : मेंदूज्वर ( जॉपनीज इन्सेफेलायटीस ) हा एक गंभीर, अपंगत्व होण्यास कारणीभूत असलेला आजार आहे. हा आजार दूषित डासांमुळे पसरतो. या आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यात ३ जानेवारी पासून जॉपनीज इन्सेफेलायटीस (जे.ई.) या आजाराच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत व ग्रामपंचायत अंतर्गत  लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. 

                यावेळी मारोडा येथील सरपंच भिकारूजी शेंडे, ग्रामपंचायत सदस्य बंडू भाऊ गेडाम सदस्या सौ. अर्चना ऊईके ,सोनी मोहूर्ले, माधुरी नीकेसर सेवंता चौधरी भाजपा युवा अध्यक्ष संजय मेकर्तीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.भांडेकर सर,विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक भुरसे सर ,येनगंटिवार सर,कुंघाटकर सर.मुप्पावार सर, व इतर शिक्षक वृंद,आरोग्य केंद्राच्या सेविका मयुरी, धर्मपुरीवार,सुकदेवे , आरोग्य सेवक सोयाम सर इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एक ते पंधरा वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात आले.

                   

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरुवातीला एक ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मूल मुलींना एक वेळेस जे.ई. लसीची एक मात्रा देऊन लसीकरण केले जात आहे. मूल तालुक्यातील मारोडा येथे लसीचा शुभारंभ करण्यात आला. 

             

 या आजाराच्या सुरुवातीला पाच ते पंधरा दिवसांत विविध लक्षणे दिसू लागतात. थंडी वाजून ताप येणे, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलटी इत्यादी लक्षणे दिसून येतात. हा आजार मेंदूमध्ये पसरून गंभीर स्वरूप धारण करू शकतो. मेंदूला झालेल्या इजेमुळे लकवा, मतिमंदत्व असे आजार राहू शकतात. एक ते पंधरा वयोगटातील मुले व मुलींना हा आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.  

सर्व पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण करून घ्यावा.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !