महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली यांचं ज्वलंत सवाल. ★ आरोग्य विभागात मनुष्यबळ अपुरा, ओमिक्राॅन वाढतोय तरी १०० % पदभरती अजूनही का झालेली नाही ?

 

महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली यांचं ज्वलंत सवाल.


★ आरोग्य विभागात मनुष्यबळ अपुरा,               ओमिक्राॅन वाढतोय तरी १०० % पदभरती अजूनही का झालेली नाही ?       


एस.के.24 तास

          

गडचिरोली : कोरोना काळात दवाखान्यात स्टेचरवर पेशंट ढकलायला माणसं नव्हती.ओमिक्रानचा वाढता प्रभाव लक्षात घेता २८ फेब्रुवारी २०२१ च्या आरोग्य सेवक परिक्षेतील गुणवत्ता धारकांतूनच १००% पदभरती करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही. आरोग्य विभागाच्या  गट 'क' आणि 'ड' चा पेपर फुटला त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेची भरती देखील लांबणीवर गेली.त्यामुळे ह्या परिक्षा कधी घेतल्या जातील व त्यावर नियुक्ती कधी करण्यात येईल या बद्दल काहीच निश्चितता नाही.सध्या २०१९ च्या जाहिरातील १०० %पदांपैकी ५० %पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे..आरोग्य सेवक 50% मध्ये बिड व पुणे जिल्ह्यातील बोगस उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पात्र उमेदवारांवर अन्याय केल्याने  त्यांची चौकशी सुरू आहे.२०११ नंतर गडचिरोली जिल्हा वगळता आदेश नसताना देखिल इतर ठिकाणी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालीच कशी? एवढे उमेदवार आलेत कुठून? एक तर अवघ्या १७ वर्षाचा. तर एका कडे रविवारी देण्यात आलेले प्रमाणपत्र.कुणाकडेही आँर्डर काॅपी , रुजू प्रतिवेदन, हजेरी पत्रक, नाही .तरी सेवाज्येष्ठता यादीत त्यांचे नाव आले कसे? ट्रेझरी बिल द्वारे त्यांचा पगार  काढण्यात आला कसा?परिक्षेचा निकाल लागल्यानंतर  प्रत्येक जिल्ह्यात गुणवत्ता यादीत बिड व पुणे वालेच   टाॅपर कसे आले?दोषींवर तसेच बोगस प्रमाण पत्र यांच्या आज पर्यत कारवाई का करण्यात का आलेली नाही?                                                                

समांतर आरक्षणाच्या ई.डब्लू.एस.चे रिक्त पद भरण्यासंबंधी३१ मे २०२१च्या शासनाच्या जि.आर.मध्ये ११व्या मुद्यामध्ये जागा पुढे न ओढता खुला मधुन भरण्यात याव्यात असे स्पष्ट निर्देश असतांना देखिल जागा का भरल्या गेल्या नाहीत ?                

माजी सैनिक साठी असलेल्या जी.आर.नुसार प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवले तरी त्यांना नियुक्तीचे आदेश का देण्यात  आले नाही ?

गडचिरोली मलेरिया रेडजोन मध्ये दरवर्षी उद्रेक होऊन मॄत्युंची संख्या जास्त असल्याने २०१५ ला ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचारी घेण्यात आले.त्यापैकी बहुतेक ९० गुण घेणारे गुणवत्ता धारक आहेत.जिल्ह्यात फक्त १९ जागा होत्या.कित्येक जिल्ह्यांत ९० गूण घेणारे पात्र उमेदवार न मिळाल्याने असंख्य जागा रिक्त आहेत.त्यांच्या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांना घेण्यासाठी नियम शिथिल करून उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध का करुन देण्यात आली नाही? वर्षानुवर्षे सेवा देणारे बहुतेक हंगामी क्षेत्र कर्मचार्यांनी पन्नाशी ओलांडली आहे.ते जुने असून ४थी पास आहेत.त्याच्यासाठी पुर्वीप्रमाणे ४थी इयत्तेच्या काठिण्यपातळीनुसार परिक्षा घेऊन त्यांना नियुक्ती देऊन त्यांच्या कार्याचा मोबदला देऊन त्यांना का गौरविण्यात आले नाही ? हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवक पदभरतीत असणारा ५०%कोटा पुर्वीप्रमाणे कायम का ठेवण्यात आला नाही?*एकाच जिल्ह्यासाठी  असणार्या उमेदवारांकडून इतर जिल्ह्यांच्या जागांसाठी देखील अर्ज स्विकारुण फि घेतली जाते तर तो ईतर जिल्ह्यासाठी देखील पात्र का नाही ? फाॅर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत साईट मध्ये प्राॅब्लेम का असतो ? कॉन्टॅक्ट साठी दिलेले नंबर लागत का नाही ? काहिंचे हाॅल टिकीट निघत नाही तर काहींना महाराष्ट्राच्या बाहेर चे  हाॅलटिकीट का दिले जाते?सेंटरवर पोहोचल्यावर पेपर का रद्द केला जातो ? एकाच दिवशी डि.एड.सि.ई.टी.आणी आरोग्य विभागाची परिक्षा ठेवण्याची चूक का घडते? 'ड' गटाच्या परिक्षार्थीना 'क' गटाचा पेपर कसा दिला जातो ? महाराष्ट्रात बससेवा बंद असताना देखील एका टोकावरील परिक्षार्थीना दुसऱ्या टोकापर्यंत परिक्षेला पाठवून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास का देण्यात आला?परिक्षेआधी पेपर फुटून व्हायरल होतातच कशी ? प्रलंबित निवड प्रक्रियेत टाळाटाळ करुन विलंब लावणार्या समन्वयहिन अधिकारी वर्गात एकसुत्रीपणा येईल कधी? जिल्हा हिवताप  कार्यालय ते उपसंचालक आणि उपसंचालक ते संचालक कार्यालयापर्यंत गुणवत्ता धारक उमेदवारांची वारंवार चकरा मारुन होणारी पायपीट थांबेल कधी ? उमेदवार उपलब्ध नाहीत अश्या रिक्त जागांसाठी अधिकारी पात्र गुणवत्ता धारकांचा अर्ज स्विकारत का नाही ? स्विकारले तर प्रस्ताव का पाठवत नाही ? स्थानिक निवड समितीला अधिकार दिले असून सूद्धा निर्णय का घेत नाही ? आम्ही मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत आमचं काम संपलं, बाकी तुमचं तुम्ही पाहत बसा,अशी उत्तरे का दिली जातात ? अहोरात्र मेहनत करून परिक्षेची तयारी करणाऱ्या आणि भविष्य  उज्ज्वल करण्यासाठी झटणाऱ्या महाराष्ट्रातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्यांच्या मुलांचा हा छळ थांबणार तरी कधी ?

हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !