आमदार पुत्रासह सात मित्रांचा अपघातात जागीच मृत्यु.



आमदार पुत्रासह सात मित्रांचा अपघातात जागीच मृत्यु.



एस.के.24 तास



वर्धा : 25 जानेवारी 2022 च्या पहाटे 1:30 च्या सुमारास वर्धा तुळजापूर मार्गावर देवळी तहसील येथे नजीकच असलेले गाव सेलसुरा येथे पुलावरून झायलो कार कोसळून झालेल्या अपघातात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील ब्लास्ट आमदार विजय रहांगडाले ह्यांचा मुलगा अविष्कार ह्याचा इतर सहा मित्रांसह जागीच मृत्यु झाला.


हे सातही तरुण सावंगी येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. यवतमाळ येथुन सावंगीला येत असताना वन्यप्राण्याला वाचविण्याच्या नादात पुलावरून झायलो कार थेट खाली कोसळली असे घटना स्थळावरील लोकांनी सांगितले आहे. सेलसुरा येथील जुना आणि नवीन पुलाच्या मधात ही गाडी कोसळली असून वेगात गाडी कोसळल्याने झायलो गाडी चकनाचूर झाली अशी माहिती भीम टायगर सेनेचे ब्लास्ट जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके यांनी सावंगी मेघे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना दिली.


माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप,सावंगी मेघे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, पोलिस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजु उराडे, पोलिस जमादार विजय परचाके, पोलिस जमादार प्रदिप राऊत, अमर लाखे व पोलिस कर्मचारी, ब्लास्ट भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके व पदाधिकारी घटनास्थळी दाखल होताच त्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केले मात्र गाडीतील कुणीही जिवंत नव्हते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


ह्या अपघातात आविष्कार रहांगडाले यांच्यासह निरज चौहान, नितेश सिंह, विवेक नंदन, प्रत्युष सिंह, सुभाष जयस्वाल,पवन शक्ती ह्यांचा जागीच मृत्यु झाला असुन सावंगी पोलीस पुढील तपास करत आहे 



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !