पत्नीला संशय घेऊन डिझेल ओतून जिवंत जाळले.★ मानवी जीवनाला काळीमा फासणारी घटना..★ मुल तालुक्यातील सुशी येथील घटना.



पतीने पत्नीला संशय घेऊन डिझेल ओतून जिवंत जाळले.

★ मानवी जीवनाला काळीमा फासणारी घटना..

★ मुल तालुक्यातील सुशी येथील घटना.


एस.के.24 तास


मुल : तालुक्यातील सुशी येते मानवी जीवनाला काळीमा फासणारी घटना मंगळवारी दुपारी 1.30 वाजता दरम्यान घडली. वृद्ध इसमांनी आपल्या पत्नीला चारित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहाण करून आपल्या पत्नीचे शरण रचून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.मुक्ताबाई गंगाराम शेंडे वय,65 वर्ष असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून तर गंगाराम सोमाजी शेंडे वय,75 वर्षे असे आरोपीचे नाव आहे.

मूल तालुक्यातील सुशी येतील मुक्ताबाई गंगाराम शेंडे या नेहमी प्रमाणे सरपणाला गेल्या होत्या. आरोपी,गंगाराम शेंडे यांनी आपल्या पत्नी, मुक्ताबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन कडाक्याच्या भांडण होऊन बेदम मारहाण करून आणलेल्या सरपण रचून जाळून टाकले. जळालेल्या अवस्थेत मुक्ताबाई यांनी वाचविण्यासाठी आरडाओरड केल्याने घरा शेजारील नागरीक धाव घेऊन गावकऱ्यांनी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले नंतर पुढिल उपचारार्थ नागपूर येथे नेत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मावळली. 

मूल पोलिसांनी आरोपीला अटक करुन पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक,पुरुषोत्तम राठोड करीत आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !