मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने हिरापूर गावात " सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिवस साजरा करण्यात आला."


मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने हिरापूर गावात " सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिवस साजरा करण्यात आला."


एस.के.24 तास


सावली : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु. निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  मूल व  सावली तालुक्यात  "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ७००३ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. 

उपक्रमाचे विषेश म्हणजे हा उपक्रम शाळेत शिक्षकांच्या सहकार्यने राबविला जात आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व मुलींचे लग्नाचे वय वाढविणे अशा हेतूने मॅजिक बस संस्था चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ०९ तालुक्यात काम करीत आहे. त्यातलाच एक सावली तालुका असल्याने येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरापूर येथे 03 जानेवारी 2022 ला सावित्रीबाई फुले जयंती आण बालिका दिवस या निमित्ताने जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये मुलींचे शिक्षण,त्यांचे हक्क, अधिकार,त्यांचे स्वतंत्र, लग्न करतांना त्यांचे मत,महाविद्यालईन शिक्षण पूर्ण करणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आत्मनिर्भर करणे यासाठी रॅलीमध्ये समस्त गावातूनच घोषवाक्य देण्यात आली विशेष म्हणजे हे घोषवाक्य मॅजिक बसच्या सहकार्यानेच विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आले होते.तसेच  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून सौ.प्रीती गोहणे सरपंच ग्रामपंचायत  हिरापूर व इतरग्रामपंचायत सद्यस्य उपस्थित होते.या रॅलीला व कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य व परवानगी सौ.मोहूर्ले मॅडम मुख्यध्यापिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरापूर तर शाळेचे शिक्षक सौ.इंदूरकर मॅडम,श्री.पाटेवार सर,श्री.शिडाम सर,श्री.लाडे सर,श्री. उईके सर यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमला व रॅलीला यशस्वी करण्यासाठी प्रियंका कोरडे  समुदाय समनव्यक मॅजिक बस यांनी खूप मेहनत आणि अथक परिश्रम घेतले तसेच श्री.मंगेश रामटेके शाळा सह्यय अधिकारी मॅजिक बस यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !