जि.प.शाळा चिरोली येथे जापानीज एन्सेफेलिटीस लसीकरण मोहीम.
पंचायत समिती सदस्या सौ.वर्षा लोणबले यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, चिरोली स्थरीय मोहिमेचा शुभारंभ.
एस.के.24 तास
मुल : जापानीज एन्सेफेलिटीस (मेंदू ज्वर) लसीकरण मोहिमेचा प्रा. आ. केंद्र चिरोली स्थरीय शुभारंभ जिल्हा परिषद शाळा, चिरोली येथे पंचायत समिती सदस्या सौ. वर्षा लोणबले व सरपंच सौ.मीनल लेनगुरे यांच्या हस्ते करण्यात आला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सदर मोहिमेची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रास्ताविकेतून वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजीत वाठोरे यांनी मेंदूज्वर या आजाराविषयी माहिती दिली तसेच या आजाराची लक्षणे आणि होणारे गंभीर परिणाम व लसीकरणामुळे होणारे फायदे सांगितले तर डॉ. माधुरी मेश्राम यांनी 1-15 वयोगटातील सर्व पाल्यानी या लसीचे डोस घेण्याचे आवाहन केले.यावेळी सर्वप्रथम लस घेणाऱ्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देऊन सौ. वर्षा लोणबले यांच्या हस्ते सन्मानित केले.
या मोहिमेत देण्यात येणाऱ्या लसीचे नाव जेनवॅक असून ही लस भारत बायोटेक या संस्थेने निर्मिती केली आहे.ही लस सुरक्षित असून काही बालकांमध्ये ताप,इंजेकशन च्या ठिकाणी दुखणे, अंगावर पुरळ इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी मेश्राम, डॉ. रणजीत वाठोरे,सौ. पौर्णिमा मेश्राम (आरोग्य सहाय्यक )सौ. बाराहते (आरोग्य सेविका), श्री. ढोंगे (आरोग्य सेवक )जि. प. शाळेचे सर्व शिक्षक,आशाताई, अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती.