सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु.



सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग (महानगरपालिका क्षेत्र वगळून ) सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहे. दि. 25 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये शाळा सुरू करण्यासाठी शासनाने वेळोवेळी संदर्भाधीन परिपत्रकांन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून तसेच दि.20 जानेवारी 2022 च्या परिपत्रकामधील मार्गदर्शक सूचनेनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.


शाळा सुरू करण्यासाठी दि. 20 जानेवारी 2022 च्या परिपत्रकामधील मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांनी सातत्याने आढावा घेऊन नमूद निकष व सूचनांचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच इयत्ता 1 ली ते 8वीचे वर्ग एका आठवड्यानंतर स्थानिक परिस्थितीचा विचार करून सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात म्हटले आहे.


सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविला संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.


सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 31 जानेवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !