समग्र आंदोलनाची धुरा महिलांनी आता आपल्याच खांद्यावर घ्यावी - कविता मडावी

समग्र आंदोलनाची धुरा महिलांनी आता आपल्याच खांद्यावर घ्यावी - कविता मडावी


लोकमत दुधे - एस.के.24 तास


सावली : पुरुषप्रधान संस्कृतीतील महिला नेहमीच दुय्यम भूमिकेत राहिल्या आहेत. कुटुंबाची हेळसांड थांबवताना तिने आपल्यातील संघटन कौशल्य, कला,साहित्य,नेतृत्व या गुणांना नेहमीच दुर्लक्षित केलेले आहे. परिणामी मनुष्य व समाज यांनी महिलांना अबला म्हणूनच गृहित धरलं आहे.समाजाने महिलांना "अबला" म्हणून दिलेले विशेषण महिलांना पुसून काढायचं असेल व आणि आपली पराक्रमी व शूर अशी ओळख निर्माण करायची असेल तर सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक , आर्थिक व पर्यायाने राजकीय आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी महिलांनी स्वयंप्रेरणेने समोर यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, महिला शाखा सावली- मूलच्या वतीने मा.सा.कन्नमवार सभागृहात आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव कार्यक्रमात मान. कविता मडावी विभागीय अध्यक्ष म.रा.कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ नागपूर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान. अरुंधतीताई दुधे, ज्येष्ठ सल्लागार तथा मुख्याध्यापिका मोखाळा या होत्या.

      म.रा.कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ महिला शाखा मूल - सावलीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव दोन सत्रात कन्नमवार  सभागृह मूल येथे साजरा करण्यात आला.

       या उत्सवाचे उदघाटन मान.रत्नमाला भोयर, नगराध्यक्ष मूल यांनी केले तर म.रा.कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ मूल- सावली महिला शाखेच्या अध्यक्षा मान.विद्या कोसे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले सत्र आयोजित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मा.कल्पना खोब्रागडे,मा.रत्नमाला गेडाम, मा.संगीता मानकर, मा.संगीता निमसरकार, मा.ज्योती सूर्यवंशी ,मा.सुवार्ता जीवने,मा.देवांगी सुरपाम,मा.विद्या कुमरे यांची उपस्थिती होती. पहिल्या सत्रामध्ये महिला व विद्यार्थ्यांसाठी  फॅन्सी ड्रेस  स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांमधून अनुजा चिकाटे, संचित  लेनगुरे, धरती भोयर, तर महिलांमधून खुमेश्वरी कोडापे,विद्या गेडाम ,इंद्रायणी जेंगठे या स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय प्राविण्य प्राप्त केले. त्यानंतर सदर कार्यक्रमात 'मोरगाडकार' मा.लक्ष्मण खोब्रागडे लिखित व मा.विद्या कोसे दिग्दर्शित "सावित्री तुझ्या लेकी" ही एकांकिका मा.विद्या कोसे, मा.संगीता मानकर, मा.संगीता निमसरकार, मा.रत्नमाला  गेडाम, मा.राजश्री कुकुडकर, मा.कुलोत्पन्ना कुळमेथे, मा.गीता साखरे, मा.चंदा तुरे व मा.सुवार्ता जीवने यांनी सादर केली तर एकपात्री प्रयोग मा.कविता रोकमवार यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर सादर केला. प्रथम सत्राचे संचालन मा.चंदा तुरे तर आभार प्रदर्शन मा.कुलोत्पन्ना कुळमेथे यांनी केले.

        सावित्रीबाई फुले जन्मोत्सव कार्यक्रमाचे दुसरे व मुख्य सत्र दुपारी 2:00 वाजता सुरू करण्यात आले. मान.अरुंधतीताई दुधे ज्येष्ठ सल्लागार तथा मुख्याध्यापिका मोखाळा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या सत्रात मुख्य मार्गदर्शिका म्हणून म. रा. कास्ट्रा.कर्मचारी कल्याण महासंघ,नागपूर विभागाच्या विभागीय अध्यक्षा मान. कविता मडावी तर प्रमुख पाहुणे मान.अंजु वाकडे, मा.छाया वरभे ,मा.शुभांगी टोंगे, मा.कल्पना पेंदोर, मा.कल्पना नंदागवळी, मा.द्वारका भडके, मा.गेडेकर मॅडम,मा.कांबळे मॅडम , मा.वैशाली पेंढारकर या होत्या.

        या सत्रात सामाजिक दायित्व निभावत आपल्या सेवेत अविरत कार्यरत राहून समाजात मानाचे स्थान निर्माण करणार्‍या मान. अरुंधती दुधे व मान.कल्पना पेंदोर  या दोन सावित्रीच्या लेकींचा संघटनेच्यावतीने  शाल,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पतीसह सत्कार करण्यात आला. मुख्य म्हणजे यात सावित्रीच्या लेकींनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन , नियोजन,दिग्दर्शन व अभिनय स्वयंप्रेरणेने केले होते.

      सर्व आयोजक महिलांनी आपला पारंपरिक पोशाख नऊवारी पातळ परिधान केला होता  व सभागृहाच्या दर्शनी भागावर सावित्रीबाई फुले यांची रांगोळी सागर आर्टस् भद्रावती यांनी अतिशय सुबकतेने  रेखाटली, हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. तर सावित्री तुझ्या लेकी ही एकांकिका मुख्य आकर्षण ठरले.आणि पाहुण्यांचे स्वागत सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन करण्यात आले ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब ठरली.

      सदर मुख्य कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन संघटनेच्या महासचिव मान.संगीता मानकर, प्रास्ताविक संघटनेच्या सल्लागार रत्नमाला गेडाम तर आभार प्रदर्शन संघटनेच्या अध्यक्षा मान.विद्या कोसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मान.डॅनिअल देवगडे उपाध्यक्ष सावली,मान. जगदीप दुधे अध्यक्ष मूल,मान.सुनील निमगडे महासचिव मूल, मान.संदेश मानकर अध्यक्ष सावली, मान.संतोष सिडाम महासचिव सावली,मा.भावना इंदूरकर,मा.सुनंदा रामटेके,मा. विद्या रामटेके,मा.कल्पना वाळके,मा.प्रतिभा वाघमारे,मा.शीला गेडाम,मा.शशिकला शेंडे,मा.स्नेहलता वाघमारे,मा.गीता मेश्राम,मा. सिंधू गोवर्धन, मा.सुमित्रा कुमरे,मा.चंदा गेडाम, मा.बेबी मेश्राम, मा. रतीशा रामटेके, मा.सपना वेलादी, मा. शरद डांगे, मा. नितीन निमगडे या सर्वांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !