मेकॅनिकल च्या ट्रायल घ्यायच्या नादात गेला वृद्ध महिलेचा जीव मिनी ट्रॅव्हल्स ची दुचाकीला धडक एक ठार दोन गंभीर जखमी.
एस.के.24 तास
वरोरा : येथील चंद्रपूर नागपुर हायवेवरील एच पि पेट्रोल पंप जवळ एका मिनी ट्रॅव्हल्स एम एच 40बी जी 6420 ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला एम एच 32 टी 2719 ला जबर धडक दिल्याने वृद्ध महिला जागीच ठार झाली तर दोघे जखमी झाल्याची घटना आज दिनांक २३ जानेवारी रोज रविवारला दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली .
सविस्तर वृत्त असे की,वरोरा चिमूर मार्गानें चालणारे प्रवाशी वाहन मिनी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 40बी जी 6420 हे वाहन काही तांत्रिक बिघाडामुळे गाडी मालकाने हायवेवरील घाटे चौक येथील एका मेकॅनिक कडे दुरुस्तीला लावले होते . तेथील मेकॅनिकल याने गाडी ट्रायल ला नेली असता हायवेवरील चंद्रपूर कडे जाणाऱ्या मार्गावरील एच पि पेट्रोल पंप जवळ चालकाचे (मेकॅनिकल) वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून चंद्रपूर मार्गानें येत असलेल्या दुचाकी वाहन एच 32 टी 2719 जबर धडक दिले यात शांताबाई शंकर गोचे (६८) रा.वडगाव तालुका वरोरा यांचा जागीच मृत्यू झाला.
तुळशीराम हरी गोचे - वय 52 रा.वडगाव,राजू शंकर गोचे – वय 38 हे गंभीर जखमी झाले . चंद्रपूर कडून येणाऱ्या १०८ रूग्ण वाहिकेच्या मदतीने त्यांना रुग्णालयात प्राथमिक उपचारा करिता आणले असता.राजू गोचे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपुर येथे पुढील उचारा साठी हलविण्यात आले तर जखमी तुळशीराम यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.मृतक व जखमी एकाच कुटुंबातील असून.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे.