मारोडा येथील तरुण युवा शेतकऱ्याच्या प्रक्षेत्रावर जिल्हाधिकारी यांची भेट.

 

मारोडा येथील तरुण युवा शेतकऱ्या च्या प्रक्षेत्रावर जिल्हाधिकारी यांची भेट.


एस.के.24 तास


मुल : सेंद्रिय खत,नैसर्गिक शेती तंत्रज्ञान वापरून मारोडा येथील युवा शेतक-्याने कमी प्रक्षेत्रावर लागवड करून हजारो रुपयाचे उत्पन्न घेतले. या प्रक्षेत्रावर पिकाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी अधिकार्यांसमवेत भेट देऊन युवा शेतकर्यांचे कौतुक केले. मारोडा येथील युवा शेतकरी प्रशांत मेश्राम यांचा युवा शेतकरी पुरस्कार साठी प्रस्ताव शासनाला कृषि विभागा मार्फत सादर करण्यात आला.


त्या अनुषंगाने जिल्हा चौकशी समिती तपासणी साठी प्रक्षेत्रावर एका पथकाने भेट दिली. प्रशांत मेश्राम यांच्या शेतावर भेट कृषी विभागाच्या देताना जिल्हाधिकारी यांनी दुध डेअरी,शेळी पालन,कूकुट पालन,सेंद्रीय भाजीपाला,मस्यपालन,सेंद्रीय टरबुज,हरभरा,मोहरी,करडी, लागवड पाहाणी केली. 


प्रशांत मेश्राम या युवा शेतक-यानेआपल्या शेतातील 5.00 आर क्षेत्रावर हिरव्या तुर शेंगा 4 क्विंटल विकुन 18 हजार रूपये मिळविले.तसेच सेंद्रीय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीत मोठ्याप्रमाणात गांडुळांची संख्या वाढण्यास मदतझाली, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.


याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,भाऊसाहेब बहाटे, उपविभागीय अधिकारी,खेडकर, उपविभागीय कृषि अधिकारी, रविंद्र मनोहरे,तहसीलदार होळी, भास्कर गायकवाड,बी.डी.ओ. कारडवार,मंडळ कृषि अधिकारी सुध्दांसु तिजारे,कृषि अधिकारी चौधरी,रवि उईके कृषी पर्यवेक्षक, शेतकरी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !