केशरवाही येथे मयताच्या कुटीबीयांना नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत.


केशरवाही येथे मयताच्या कुटीबीयांना नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत.


सावली (लोकमत दुधे )


सावली : राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार हे नुकतेच सावली तालुका दौऱ्यावर आले असता केशरवाही येथील कार्यकर्ते प्रमोद भोपये आणि वामन भोपये यांनी केशरवाही येथील मृत वनिता किशोर मेश्राम या महिलेची हकीगत संगीतिली होती त्यानुसार माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांनी आर्थिक मदत पाठविली याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजा केशरवाही येथील महिला नामे वनिता मेश्राम या आजाराने ग्रस्त होत्या त्यातच त्याचावर काळाने झडप घातली त्यांना दोन लहान मुले आहेत त्यात एक 5 वर्षे, व दुसरा 3वर्षे वयाचा लहान मुले आहेत अगदी बालवयात आईचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती

 लहान मुलांना मदत व्हावी या हेतूने केशरवाही येथील कार्यकर्तनी आपली भावना व्यक्त केली होती त्यानुसार केशरवाही येथील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोपये व वामन भोपये यांच्या माध्यमातून आज आर्थिक मदत देण्यात आली

 यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, नरेश पाटील गड्डामवर, हिरापूरचे उपसरपंच शरद कंनाके, सेवा सहकारी संस्था हिरापूर चे संचालक मुखरू पाटील गोहणे, पतरुजी भोपये, निखिल शिवणकर, राजकुमार घेर, दादाजी भोपये, उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !