अहेरी तालुक्यात कलापथक च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती.




अहेरी तालुक्यात कलापथक च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती.


एस.के.24 तास


गडचिरोली : जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली व आश्रय बहुउद्देशीय संस्था वाळवंटी चौक,चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना कलापथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

अहेरी तालुक्यातील बोरी,महागाव बुज,चिंतलपेठ, आप्पापल्ली,वेलगुर,चेरपल्ली,किष्टापूर (वेल) नवेगाव येथे शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती करिता राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची व जिल्हा वार्षिक योजनांची माहिती कलापथक च्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष,सौ,आशा दिवाकर मुळे,त्यांच्या कलापथक संचाने गीत,नाट्य,संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती दिली.

या वेळी,कलावंत : - सुरेश कन्नमवार,मंगलदास मशाखेत्री, शोषित खोब्रागडे,पवन भांडेकर,पंकेश येरमलवार,वैभव रामटेके,शुभम रामटेके,रोशन लाटेलवार,काजल मेश्राम, तिलोत्तमा चुधरी आदी कलावंतांनी कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !