गडचिरोलीत मोठी कारवाई; जहाल नक्षलवाद्याला बेड्या, हत्येसह अनेक गुन्ह्यात सहभाग.
एस.के.24 तास न्युज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीत पोलिस दल आणि सीआरपीएफनं (Gadchirolipolice and CRPF) केलेल्या कारवाईत एका जहाल नक्षलवाद्याला (Naxal Arrest) बेड्या ठोकल्या आहेत. जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे याला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. शासनाने त्याच्यावर दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत त्याला पकडण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जांभिया) जंगल परिसरात विशेष अभियान पथक व सीआरपीएफ बटालियनचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात आली. नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील मौजा गोरगुट्टा येथील रहिवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे (वय 30) हा प्लाटून क्रमांक 14 च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता.