शिक्षकावर निलंबनाची कारवाई ..! ★ मुख्य कार्यकारी अधिकारी सेठी यांचे आदेश. ★ मद्यधुन्ध अवस्थेत येत होता शाळेत. ★ शाळेत सभापती च्या भेटि दरम्यान होता दारुच्या नशेत.

 

अखेर त्या मद्यपी शिक्षकावर निलंबनाची कारवाई ..!


★ मुख्य कार्यकारी अधिकारी सेठी यांचे आदेश.


★ मद्यधुन्ध अवस्थेत येत होता शाळेत.


★ शाळेत सभापती च्या भेटि दरम्यान होता दारुच्या नशेत.


लोकमत दुधे - एस.के.24 तास - सावली


सावली : शालेय वेळेतही शिक्षक मद्यधुंद अवस्थेत राहत असल्याची पालकांची तक्रार व पंचायत समिती सभापती,विजय कोरेवार यांचे भेटीत आढळल्याने संबंधित शिक्षकाची पाथरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली होती. शिक्षकाच्या वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल करून  कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदला सादर करण्यात आला. प्रकरणाची दखल घेत मुख्यकार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी दिलीप ढोक या शिक्षकास निलंबित केले.


     सावली तालुक्यातील उसरपार तुकुम येथील  मुख्यध्यापक दिलीप ढोक हे नेहमी दारू पिऊन येत असल्याने पालकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. तक्रारीची दखल घेत सभापती विजय कोरेवार यांनी अचानक शाळेत भेट दिली असता मुख्यध्यापक दारू पिऊन आढळले. शालेय वेळेत दारू पिऊन कर्तव्यात असल्याची तक्रार खुद्द सभापती विजय कोरेवार यांनी पाथरी पोलीस स्टेशनमध्ये केली. सदर शिक्षकाची वैद्यकीय तपासणी गुन्हा दाखल करण्यात येऊन पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून कारवाईकरीता अहवाल जिल्हा परिषदला सादर केला. या प्रस्तावाची दखल घेत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे आदेश दिला.सभापती,विजय कोरेवार यांच्या धडक कारवाईमुळे सावली तालुक्यात खळबळ माजली आहे.


शिक्षणासारख्या पवित्र कार्यात दारू पिऊन राहणे ही गंभीर बाब आहे. असाच प्रकार केशरवाही शाळेत चालत असल्याने येथील शिक्षक,रजनीकांत गेडाम व इतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांचा प्रस्तावही जिल्हा परिषदला पाठविला आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केल्या जाईल. 

विजय कोरेवार - सभापती पंचायत समिती,सावली

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !