सामदा बुज येथील दागोबा रेती घाट रेती चोरिचा बनला हासस्पाट. ★ सर्रास पणे रेती चोरिचा धुमाकुळ,परिसरात रेतीची मोठ मोठी ढिगारे. ★ दररोज १० ते १५ ट्रक्टर कडून केला जातो उपसा.

सामदा बुज येथील दागोबा रेती घाट रेती चोरिचा बनला हासस्पाट.


★ सर्रास पणे रेती चोरिचा धुमाकुळ,परिसरात रेतीची मोठ मोठी ढिगारे.



★ दररोज १० ते १५ ट्रक्टर कडून केला जातो उपसा.


  एस.के.24 तास 

लोकमत दुधे - सावली


सावली : संबंधित अधिका ऱ्याच्या दुर्लक्ष्यतेचा फायदा घेत रेती माफ़ियानी तालुक्या लगत असलेल्या वैनगंगा नदितिल अनेक रेती घाटावरुण सर्रास पने रेती चोरिचा सपाटा सुरु केला आहे त्यामुळे साखरी घाटा प्रमानेच तालुक्यातील  सामदा बुज येथील दागोबा रेती घाट सुधा रेती चोरिचा हासस्पाट बनत आहे दररोज सदर घाटावरुन १० ते १५ ट्राक्टर च्या माध्यमातून आळी पाळीने रेतीची तस्करी केलि जात आहे मात्र अश्या गंभीर बाबिकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते सावली तालुक्यातील  कोणत्याही रेतीघाटाचे लिलाव अद्याप  झालेले नसले तरी बांधकाम करणाऱ्यांना मात्र छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून  मोठी वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे  करोडो चा उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील सामदा बुज दागोबा घाट  येथून अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असते.पावसाळ्यातील दोन महीने सोडले तर वर्षभर ही रेती तस्करी चालूच असते.सध्या अवैध  सामदा बुज घाट चालू असून या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात, नालापात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.

रेतीमाफिया अवैध रेतीचा साठा करून दामदुप्पट भावात विकत असतात. 

एखाद्या वेळेस अधिकारी  येतो थातूर मातूर  आणि काना डोळा करून लगेच निघुन जातात .त्यामुळे सर्व रेती तस्कर आपली टीम परिसरात बंदबसतात ठेऊन जागेवर माल पोहचवितात अधिकारी येणार ही खबर लक्षात येतात  ट्रॅक्टर गावाजवळ लावुन ठेवतात.व अधिकारी गेल्यानंतर परत वाहतूक चालू होते. अवैध उत्खनन व वाहतुकीला संबंधीत  विभागाणी  आळा घालणे आवश्यक आहे.सामदा  घाटातून जवळपास पंधरा वीस ट्रॅक्टरद्वारे  घाटातून दररोज शेकडो ब्रास रेतीचे अवैध चोरी सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे दिवस रात्रीच्या वेळी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीने रेती वाहतूक होत आहे.

 व्याहाड बुज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे करोडो चा बांध  काम सुरु आहे या  परिसरातील खासगी व शासकीय बांधकामांना सर्रासपणे रेती पुरविली जात आहे मात्र विभागा ची  कारवाई शून्य आहे.तालुक्यातील परिसरात रेतीमाफियांची मोठी टोळी असून ते प्रशासन सुस्त असल्याचा फायदा घेत आहेत. 

 सावली तालुक्यातील अनेक ठिकाणवरून  रेतीची तस्करी करतात यावर मात्र प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसुन येत नाही.अनेक वेळा यासंदर्भात महसूल विभागा माहित होऊन सुद्धा कोणतीही कारवाई केलेली नसताना सुस्त प्रशासकीय अधिकारी ससेलोटे  करीत असल्याची नागरिक चर्चा करीत असून वरिष्ठ अधिकारी सुद्धा याकडे नजर अंदाज करीत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. व्याहाड बुज आरोग्य केंद्राच्या कामासाठी तर रेतीची मोठी ढिगारे दिसताना याकडे कुणाचे लक्ष नाही या बाबत शंका व्यक्त केलि जात आहे  

 कोरोणा महामारीने संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यात हाहाकार माजला असला तरी सावली तालुक्यात मात्र रेती तस्करांना खुली सुट दिली असल्याचे दिसून येत आहे. यावर वेळीच आळा घातला जावा शासनाच्या करोडो रुपयांचा महसूल डूबत असला तरी ट्रॅक्टर मालक बिनधास्त रेतीचा दाम दुपटीने विकत असतात त्यामुळे विविध योजनेत अंतर्गत आलेली घरकुलाचे बांधाकाम करावे की नाही असेही लाभधारकांकडून बोलले जात असले तरी रेती माफिया मस्त तर प्रशासन सुस्त असल्याचे दिसुन येत आहे वर्ष बदलले नवे वर्ष सुरु झाले  मात्र मागील वर्ष्या प्रमाणे नव्या वर्ष्यातही  रेतीचा लिलाव होणार की नाही मात्र माफिया कडून  अनेक रेती घाटावरुन रेती चोरिचा सपाट नेहमीच सुरु राहिल आणि शासनाचा महसूल बुडविला जाईल यात शंका नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !