गडचिरोली जिल्हयात ३१३ कोरोना तपासण्यांपैकी २२ कोरोनाबाधित,तर ३ कोरोनामुक्त. ★ चामोर्शी व धानोरा तालुक्यात आढळले एक एक ओमायक्रॉनचे रुग्ण. ★ जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन.

 

गडचिरोली जिल्हयात ३१३ कोरोना तपासण्यांपैकी २२ कोरोनाबाधित,तर ३ कोरोनामुक्त.


★ चामोर्शी व धानोरा तालुक्यात आढळले एक एक ओमायक्रॉनचे रुग्ण.


★ जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन.


एस.के.24 तास


गडचिरोली : जिल्ह्यातून ३० डिसेंबर रोजी पाठवलेल्या ओमायक्रोन तपासणीतील नमुन्यांमध्ये दोन नमुने ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यातील पहिला नमुना ७ डिसेंबर २०२१ रोजी घेतलेला होता तर दुसरा नमुना २८ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आला होता. दर महिन्याच्या ३० तारखेला पुणे येथून दिल्लीला विविध जिल्ह्यातून निवडक नमुने तपासणीसाठी पाठवले जातात. गडचिरोली जिल्ह्यातील तपासणीचा अहवाल काल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यातील वरील दोन नमुने ओमायक्रोन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. सद्यस्थितीत ७ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण बरा होऊन घरी परतला असून दुसरा रुग्ण धानोरा येथील सीआरपीएफ जवान आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची तब्येत चांगली असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.


तर आज गडचिरोली जिल्हयात ३१३ कोरोना तपासण्यांपैकी २२ नवीन कोरोना बाधित झाले असून ३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.  जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३१०२० पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३०१०७ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १६६ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७४७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.५४ टक्के तर मृत्यू दर २.४१ टक्के झाला आहे. आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील १८,  चामोर्शी तालुक्यातील ०१, आणि वडसा तालुक्यातील ३ जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३ रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील १, आणि अहेरी तालुक्यातील २ जणाचा समावेश आहे.


पहिला डोस घेतलेले ८४.५० टक्के तर दुसरा डोस घेतलेले ५७ टक्के


जिल्ह्यात पहिला डोस न घेतलेले १२९७३८ जण बाकी आहेत. तसेच दुसरा डोस कालावधी आलेला असूनही न घेतलेले जवळपास २२९८१५ जण आहेत.  जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी ८४.५० इतकी झाली असून दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी ५७.०४ एवढी आहे. जिल्हा प्रशासनाकडून लसीकरणाबाबत गावोगावी लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात येत असून उर्वरित नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !