मुल तालुक्यातील कवळपेठ येथील शेतकऱ्यावर वाघाने केला हल्ला.



मुल तालुक्यातील कवळपेठ येथील शेतकऱ्यावर वाघाने केला हल्ला.


एस.के.24 तास


मुल : नवीन वर्षाच्या दिवसीच  स्वतःच्या घरचे जनावरे चराईसाठी चिचपल्ली वनपरीक्षेत्रातील मुल तालुक्यातील कवळपेठ येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन जखमी केले. गंगाराम कान्हुजी शेंडे वय 58 वर्षे रा. कवलपेठ असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.


मुल तालुक्यातील कवळपेठ हे गाव चिचपल्ली वनपरीक्षेत्रा अंतर्गत येत असून यापरिसरात वन्यजीव मोठ्या प्रमानात आहेत. 31 डिसेंबर दिवशी डोणी येथील युवक वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाल्याची घटना ताजी असताना नवीन वर्षाच्या दिवसीच  कवळपेठ येथील गंगाराम कान्हुजी शेंडे वय 58 वर्ष हा स्वतःच्या घरचे जनावरे चराईसाठी यशवंत चलाख यांच्या शेतात घेऊन गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करुन जखमी केले.

सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचार्यांनी जखमी शेतकऱ्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सामान्य रुग्णालय चंदपूर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. 

चिचपल्ली वनपरीक्षेत्राच्या वनपरीक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनात मुलचे क्षेत्र सहाय्य्क प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले,शितल चौधरी करीत आहे.

 

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !