प्रा.आ.केंद्र चिरोलीतील 7 आरोग्य कर्मचारी कोविड बाधित.
राजेंद्र वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास
मुल : प्रा.आ.केंद्र चिरोलीत तब्बल 1 वैद्यकीय अधिकारी आणि 6 कर्मचारी असे एकूण 7 कोरोना पॉझीटीव्ह आढळून येऊन परिसरातील चिरोली आणि सुशी येथील 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रातील 7 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे.त्यापैकी 3 कर्मचारी हे कोमोरबीड असून त्यांना गृह विलगीकरणासाठी ठेवले असून काही रुग्णांना कोविड केर सेन्टर मूल ला पाठवण्यात आले आहे.त्यामुळे प्रा.आ.केंद्र चिरोली काही दिवसा साठी बंद ठेवण्यात यावी याची मागणी जनते कडून होत आहे