सौ.वर्षा भांडारकर बनल्या शहर स्वच्छता अभियान ' ब्रॅण्ड अम्बेसिडर ' मुल नगर परिषद स्वच्छता अभियान.2022

 

सौ.वर्षा भांडारकर बनल्या शहर स्वच्छता अभियान ' ब्रॅण्ड अम्बेसिडर '

मुल नगर परिषद स्वच्छता अभियान.2022


एस.के.24 तास


मुल : पर्यावरण प्रेमी व नवभारत विद्यालय मूल च्या शिक्षीका सौ. वर्षा भांडारकर यांची "मूल नगरपरिषद स्वच्छता अभियान..२०२२" करीता ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत तसा ठराव पारित करून सर्वानुमते वर्षा भांडारकर यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.तसे नियुक्तीपत्र नगर परिषद मुख्याधिकारी मेश्राम साहेब यांनी प्रधान केले आहे.


संपुर्ण जिल्हयात  पर्यावरण व वृक्षप्रेमी म्हणून सौ. भांडारवार यांची ख्याती आहे.वृक्षवल्ली संगोपणासाठी आपला संपुर्ण वेळ घालविताना विद्यार्थ्याना पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्त्व प्रत्यक्ष आचरणातून समजावणे,परिसरातील जनतेमध्ये जनजागृती करण्याकरीता सौ.भांडारकर सतत प्रयत्न करत असतात.


 नगरपरिषद मूल अंतर्गत स्च्छता अभियान मोहीम मोठया स्तरावर राबविण्यात येते.सौ. भांडारकर यांची ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आल्याने मूल शहरात स्वच्छता अभियान मोहीम भरधाव राहील अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत असून सौ.भांडारकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !