विवेकानंद विद्याभवन अड्याळ जिल्हा भंडारा च्या माजी विद्यार्थ्यांचा ईयत्ता पाचवी ते दहावी (सन 1982 ते 1988 बॅचचा) प्रथमच ऑनलाईन स्नेहमिलन सोहळा संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : विवेकानंद विद्याभवन अड्याळच्या माजी विद्यार्थ्यांचा ईयत्ता पाचवी ते दहावी (सन 1982 ते 1988 बॅचचा) स्नेहमिलन सोहळा शाळेच्या आवारातच दि.१६/०१/२२ रोजी घेण्याचे योजिले होते परंतु कोविड शासकीय निर्बंध असल्यामुळे प्रथमच हा स्नेहमिलनाचा सोहळा ऑनलाइन पद्धतीने *ठरलेल्या दिवशीच* दि. १६/०१/२२ रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. या कार्यक्रमात बरोबर शिकत असलेले दिवंगत विद्यार्थी आणि दिवंगत शिक्षक ह्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविकात नारायण जूवार ह्यांनी स्नेहमिलनाचे महत्त्व विशद केले.ह्यावेळी उपाध्यक्ष किशोर सायगण, प्रमुख पाहुणे संगीता पोटवार- चल्लावार व सीमा लाडे- साखरे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. सुनंदा टेंभुर्णे - राऊत ह्यांनी आपल्या मधुर आवाजाने संचालन केले आणि सैंग कोहपरे ह्यांनी आभार प्रदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात सर्वांच्या परिचयाचा कार्यक्रम शालेय दाखल खारीज रजिस्टर नुसार* सैंग कोहपरे ह्यांनी घेतला. ह्यामध्ये प्रत्येकाने दहावी नंतर च्या आयुष्यातील ३३ वर्षाच्या महत्वाच्या घटनांविषयी आणि त्याच्या उन्नतीविषयी माहिती दिली. सर्वांच्या चेहऱ्यावर तीन दशकांनंतर भेटल्याचा आनंद अमर्याद होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैंग, किशोर, सीमा, सुनंदा, नारायण,संगीता, संजय, माया ह्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने उमेश टेभुंर्णे,प्रशांत बोदेले,संजय ब्राम्हणकर, मोहन आराध्य,देवानंद शिंगाडे,बबन ढवळे, माया शिवनकर,मिना वाडेकर, मंदा शहारे,सौंद्रा ढवळे ,पुस्तकला शिंगाडे,वंदना गंधे,हे सर्व मित्र मैत्रिनीआवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सर्वांचेआभार व्यक्त करून करण्यात आली.