शॉर्टसर्किटने इमारतीत आग लागून 10 ते 11 लाखाचे नुकसान, राजुरा तालुक्यातील अंगदनगर बामणवाडा येथील घटना.
राजेंद्र डी.वाढई ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास
राजुरा : सदर घटनास्थळ तालुक्यातील अंगदनगर बामणवाडा येथील श्री.हितेंद्र सुदाम गिरसावळे वय,30 वर्ष प्लॉट क्र.116 राहणार अंगदनगर येथील घर मालकीचा असल्याने घराच्या वरच्या माळ्यावर माधुरी अजित सिंग त्या राहत असून दिनांक,16/01/ 2022 च्या दुपारी 1.30.वा.च्या सुमारास शार्ट सर्किटमुळे आग लागून तेथील घरातील साहित्य जळून नुसकान झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत सदर बेडरूमचे आत कुलर असलेल्या बोर्ड मधून शॉर्टसर्किट झाल्यासारखे दिसून येत आहे.तसेच महिला सौ.माधुरी अजित सिंग या सांगत आहे की दिनांक,16/01/2022 चे दुपारी एक ते दीड वाजता च्या दरम्यान तसेच तिची आई,वच्छलाबाई विश्वनाथ रामटेके वय,75 वर्ष बहीण,धनेश्वरी अशोक पाटील वय,43 वर्ष बहिणीची मुलगी,व दोन मुली तसेच दुसऱ्या बहिणीची मुलगी स्नेहा ज्ञानेश्वर पाटील हे सर्वजण घरी असतानाब बेडरूम मध्ये अचानक दूर निघत असल्याने त्यांनी फायर ब्रिगेडला बोलावून आग विझविण्यात आल्याने सांगत आहे.त्या नंतर जाऊन पाहणी केल्यानंतर सदर महिलेच्या घरातील कुलर आलमारी तसेच त्या मधील कपडे व महत्त्वाची कागदपत्रे, पलंग व कपडे टेबल लॅपटॉप मोबाईल,स्टडी टेबल,पूजा घर, खाठ इतर कपडे तसेच बहिणीची बॅग मधील 60 ते 70 हजार रुपये व तिचे स्वतःचे 50 हजार रुपये तसेच सोन्याचे दागिने व इतर लहान घरगुती सामान जळण्याची सुमारे 10 ते 11 लाख रुपयांची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच सदर घराचे इलेक्ट्रिकल व अल्युमिनियम खिडक्या,दरवाजे यांचे सुद्धा पण नुसकान झाल्याचे दिसून येत आहे सदर घटनास्थळी पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचून पाहणी केल्यास सदर घटनास्थळ सदर शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे निरदर्शनास आले सदर पुढील तपास राजुरा पोलीस स्टेशन,पोलीस निरीक्षक करीत आहेत.