राज्य पत्रकार संघाचे "Mirror Man" मान. विश्र्वासराव आरोटे.
वाढदिवस विशेष...
लेखन : - प्रा.महेश पानसे,विदर्भ अध्यक्ष,राज्य पत्रकार संघ
एस.के.24 तास
मुल : राज्य पत्रकार संघाचे दोन मोहरे सवंश्रुत आहेत. एक 'सर्वमान्य नेतृत्व' असलेले मा.वसंत मुंडे व दुसरे "मिरर मैन" ठरलेले संघाचे राज्य सरचिटणीस
मा.विश्वासराव आरोटे. योगायोगाने दोघांचाही वाढदिवस संघातफै १जाने.ला एकत्रीतपणे साजरा होत असतो. संघाचा प़त्येक घटक संघटनेच्या सुरेल संचालना संबंधाने
या दोन्ही प़तिभावंताकडे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून बघत असतो. जमिनीवर पाय टेकणारा,संघटनेच्या सवॉत शेवटच्या
घटकासी नाळ जुळलेला संघटनेचा
बोलका चेहरा, नव्हे "मिरर मैन" म्हणजे
आमचे मा.विश्वासराव् आरोटे. महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर गोवा, कर्नाटक, गुजरात ते दिल्ली पर्यंत राज्य पत्रकार संघाचे साम़ाज्य पसरविण्यात
मा.आरोटे साहेबांचे योगदान अगदी
स्पष्ट आहे. प़देशाध्यक्षांचे सोबतीने
काम करणारा हा जिद्दी, चंचल,मेहनती
म्होरक्या संघटनेची ओळख बनून गडचिरोली ते गोवा पयंतच्या सदस्यांचे
हदयात वसला आहे. आणी मा.आरोटे
साहेबांचे कायॉचा हाच माेठा दाखला
आहे. आरोटे व राज्य पत्रकार संघ असे एक समिकरण तयार झाले म्हंटल्यास नवल नसावे. संघटनेच्या प्रत्येक घटकांबाबत असलेली आंतरीक तळमळ मा.आरोटे साहेबांचे अविरत
धावपळीतून लक्षात येते. संघटनेतील प्रत्येक घटकाने ही तळमळ सांभाळून,
पुढाकार घेणे हिच खर्या अर्थाने मान. आरोटे साहेबांना वाढदिवसाची मनस्वी शुभेच्छा ठरेल.
मान. संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनात पत्रकार संघ सांभाळण्याची सक्षमता व सहजता लाभलेल्या पहिल्या फळीतील दोन मुत्सद्धांना मी अनुभवले आहे. मान. वसंत मुंडे व मान. विश्वासराव आरोटे. मा.आरोटे साहेबांची संघटन साफल्यासाठी धावपळ व संघटन कौशल्य यातून अलंकारीत झालेले "मिरर मैन" म्हणजे आमचे राज्य सरचिटणीस मा.विश्वासराव आरोटे. सर्वसामान्य सदस्य व पत्रकारांना मा.आरोटे साहेबाची संयमी, प़ामाणिक धडपड आदर्शवत ठरावी अशीच आहे.
पत्रकार संघाचे खऱ्या अर्थाने नेतृत्व करणार्यांना सतत काटेरी मुकुट शिरावर घेऊन मागेपुढे करावे लागते. प्रचंड उर्जा खर्च करावी लागते कारण पत्रकारांचे ,पत्रकारितेती घटकांचे प्रश्न सोडविताना पुढे पुन्हा अनेक प्रश्न उभे ठाकतात व प्रश्नांची उकल करून शासन दरबारी उत्तर सुद्धा आपणच सादर करावी लागतात. या विचित्र चक्रव्यूहातून स्वतःसोबत संपूर्ण संघाला सावरून सन्मानित करण्याचे श्रेय मा. मुंडे साहेबांना व सोबतच मा.आरोटे साहेबांना सुद्धा जाते व यामुळेच ते "मिरर मैन"' ठरले आहेत.
राज्य पत्रकार संघात "Quantity व Quality" यांची सांगड घालण्यात जे मोठे यश पदाधिकाऱ्यांना मिळाले आहे
यात प्रदेशाध्यक्ष मान. वसंत मुंडे यांचेसह मोठा वाटा मा.विश्वासराव आरोटे यांचाही आहे. पत्रकार सुष्टीच्या समस्या शासनस्तरावर सतत भांडून सोडवाव्या लागतात. एकीकडे शासन दरबारी भांडताना दुसरीकडे सामाजिक सहकार्य संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रमातून पदरी पाडून घेण्याचे कौशल्य शिकविण्याचे महतकार्य मान. आरोटे साहेब यांनी केले आहे. राज्य पत्रकार संघ 365 दिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.
मान.आरोटे साहेबांची कल्पकता, जिद्द मेहनत ,क्षमता किंबहुना एकत्रित व्यक्तिमत्व व संघातील हजारो पदाधिकारी व सदस्यांना लाभणारे त्यांचे मार्गदर्शन हे आमचे सौभाग्य. त्यांच्या कथनी व करणीतून संघटनेतील प्रत्येक घटकाला ऊर्जा मिळत आहे.
"मिरर मैन"ठरलेल्या मान.आरोटे साहेबांना राज्य पत्रकार संघाचे दीर्घकालीन वृत्तपत्र सुरेल संचालनाकरीता दीर्घ काळ आरोग्य व आनंदायी आयुष्य लाभो हीच शुभेच्छा....!!!