धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी आपण सहकार्य केले पाहिजे - हरिश्चंद्र लाडे
एस.के.24 तास
भंडारा : लाखणीतालुक्यातील पालांदूर चौ येथील सरस्वती विद्यालयात अल्पसंख्याक दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाडे बोलत होते.ते म्हणाले की भारताचे संविधानमध्य कलम 30 नुसार इस्लाम, बौद्ध,ख्रिश्चन, शीख, जैन व पारसी या सहा धर्माच्या लोकांना अल्पसंख्याक म्हटले आहे.यांना त्यांच्या भाषेवरून किंवा धर्मावरून कोणतेही हक्क नाकारता येणार नाही.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या विकासात या सर्वच धर्माच्या लोकांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांचे हक्क मिळण्यासाठी आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे ." असे प्रतिपादन त्यांनी केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. ए. सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मंचावर श्री,नामदेव गिर्हेपूजे,ईश्वर हटवार, स्वीटी चव्हाण, जयश्री हटवार ,मंगेश गिरी उपस्थित होते.
प्रारंभी 5 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्य जागृतीसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कु स्वेजल क्रीष्णा पराते हिने इंग्रजी मधून भाषण केले तर कु योगिता बावणे हिनेही विचार मांडले.