वाघाच्या हल्ल्यात युवक ठार ! फुलझरी डोनी रस्त्यावरील घटना.
एस.के.24 तास
मुल : फुलझरी वरून डोनी येथे जात असताना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटनाकक्ष क्रं.351 मध्ये घडली.
भारत रामदास कोवे रा.डोनी वय,23 असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
मुल तालुक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील डोनी येथील भारत रामदास कोवे रा.डोनी वय 23 वर्ष हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता.
काम पूर्ण करून फुलझरी मार्गे डोनी येथे सायंकाळी 7.00 वा. दरम्यान जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घेऊन जागीच ठार केला.
सदर घटना मुल बफर क्षेत्रातील करवन क्रं.351 मध्ये घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मुल येथे आणण्यात आले.
घटनास्थळाला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी,नायगमकर जानाळाचे क्षेत्र सहाय्यक,विनोद धुर्वे,मुलचे पोलीस निरीक्षक, सतीषसिंह राजपूत यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.