सावली तालुक्यातील पेंढरी वन उपक्षेत्रातील घटना.
सुरेश एस.कन्नमवार (मुख्य संपादक - एस.के.24 तास)
सावली : तालुक्यातील पेंढरी येथे पट्टेदार वाघाला ठार मारून त्याला काढून ठेवले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.
कक्ष क्रमांक 1667, या संरक्षित वनात हे वाघ गाडून ठेवण्यात आले होते. या प्रकरणात वन विभागाने चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सावली तालुक्यातील वन उपक्षेत्र पेंढरी मक्ता कक्ष क्र 1667 येथील घटना आज 16/12/2021 रोजी गुप्त माहितीनुसार श्री.पांडुरंग मोनाजी गेडाम यांच्या घराची झडती घेतली असता वाघाच्या मीश्या जप्त करण्यात आले.
वनविभागाने सखोल चौकशी केले असता हिराचंद मूखरू भोयर रा.पेंढरी यांच्या शेतामधे संबधिताने अंदाजे 2 ते 3 महिन्यापूर्वी विद्युत करंट लावून वाघाला ठार मारले.
त्याला रामदास बाजीराव शेरकी व मारोती पोचू गेडाम रा.पेंढरी यांच्या मदतीने वाघाला कक्ष क्र. 1667 (संरक्षित बन) गाडल्याची कबुली दिली. सदर आरोपीला ताब्यात घेतली असून त्याचा FCR घेण्याची कार्यवाही सुरु आहे.