ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणूक थांबवा - आ.नरेंद्र भोंडेकर

 


ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणूक थांबवा - आ.नरेंद्र भोंडेकर


एस.के.२४ तास


भंडारा : ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेण्यात येवू नये अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. मागणीचे निवेदन आज निवडणूक आयुक्त, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.

 6 डिसेंबरला गोंदिया भंडारा जिल्हा परिषद निवडणूक नामनिर्देशनाचा अखेरचा दिवस होता. त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अध्यादेशाला खारिज केल्यामुळे निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गातील जागांच्या निवडणूकीला स्थगिती देवून ईतर जागांवरील निवडणूकीची प्रक्रीया सुरू ठेवली आहे. त्यामुळे ओबीसी मतदारांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. निवडणूकी दरम्यान कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक निकालानंतर जि.प. अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापती निवडतांना पेचप्रसंग निर्माण होवू शकतो. निवडणूक स्थगीत करण्याच्या आदेशानंतर ओबीसी संघटनांमध्ये निवडणूकीवर बहिष्काराची घोषणा सुरू झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका घेवू नयेत अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !