ऑल इंडिया पॅंथर सेना संघटनेचे लाखनी तहसीलदार यांना निवेदन.
एस.के.२४ तास
भंडारा : 6 डिसेंबर 2021 रोजी चैत्यभूमी मुंबई येथे आंबेडकर अनुयायी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरीता मोठया संख्येने उपस्थित होत असतात.मात्र यावेळी महानगरपालिका व प्रशासनमध्ये याठिकाणी आलेल्या जनतेला कुठल्याही प्रकारची मदत / व्यवस्था करण्यात आली नव्हती.यासाठी शिवाजी पार्क खुले केले पाहिजे,अशी मागणी करण्यात आली होती.मात्र तेथेच काही समाजातील विविध प्रकारच्या लोकांनी गदारोळ माजला असे असतांना केवळ एक समाज हितासाठी लढणाऱ्या भाई दिपक केदार यांचे विरोधात व काही कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार हे मागच्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील वंचित,पिडीत,शोषीत, समाजाच्या रक्षणासाठी अहोरात्र अन्यायाविरोधात लढा देत आहेत. त्याप्रसंगी सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात उभे राहणारे व्यक्तीमत्व म्हणून पँथर दिपकभाई केदार यांचेकडे महाराष्ट्र सरकार वाकड्या नजरेने पहात आहेत त्या दृष्टीकोनातून 6 डिसेंबर 2021 ला चैत्यभूमीवर महामानवास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या पेंथर दिपकभाई केदार व कार्यकर्त्याांस दडपशाही च्या मार्गाने पोलीस प्रशासन व शासन यांनी वेठीस धरुन ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार व संघटनेच्या सहकार्यावर विविध कलम नुसार गंभीर गुन्हे समाज हितासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.असे आम्ही कदापी ही खपवून घेणार नाही.तरी ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार व कार्यकर्ते यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.तसेच त्यांना तात्काळ सुटका करण्यात यावी.अन्यथा आम्ही राज्यव्यापी तीव्र आंदोलन ऑल इंडिया पँथर सेना मार्फत करण्यात येईल.याचे सर्वस्वी जबाबदार शासन राहील.असा इशारा लाखनी तालुका ऑल इंडिया पँथर सेना संघटनेच्या माध्यमातून आज दिनांक 9 डिसेंबर 2021 लाखनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दिनेश वासनिक,तालुका अध्यक्ष परमानंद मेनपाले,लाखनी शहर अध्यक्ष सचिन श्यामकुवर,नितेश मेश्राम,राकेश मेश्राम,राहुल धोटे,ओमप्रकाश खोब्रागडे,पितांबर चचाने,रवी रामटेके,रूपलताताई जांभुळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.