नगर पंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 62.82 टक्के मतदान.


नगर पंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 62.82 टक्के मतदान.


एस.के.24 तास


चंद्रपूर  : जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती, सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीच्या सार्वत्रिक तर नागभीड नगर परिषदेच्या पोटनिवडणुकिकरीता दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 62.82 टक्के मतदान झाले.

यात सावली नगरपंचायतीकरीता दुपारी 3.30 वाजेपर्यंत 4284 मतदारांनी (स्त्री – 2343, पुरुष – 1941 मतदार, एकूण टक्केवारी 64.32 ), पोंभुर्णा नगर पंचायतीकरीता 2458 मतदारांनी (स्त्री – 1284, पुरुष – 1174 मतदार, एकूण टक्केवारी 65.51 ), गोंडपिपरी येथे 3361 मतदारांनी (स्त्री – 1752, पुरुष – 1609 मतदार, एकूण टक्केवारी 63.14 ), कोरपना येथे 2713 मतदारांनी (स्त्री – 1319, पुरुष – 1394 मतदार, एकूण टक्केवारी 79.51 ), जीवती येथे 2110 मतदारांनी (स्त्री – 1028, पुरुष – 1082 मतदार, एकूण टक्केवारी 66.71), सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीकरीता दुपारी 3.30 वाजेपर्यंत 7499 मतदारांनी (स्त्री – 3954, पुरुष – 3545 मतदार, एकूण टक्केवारी 60.76 ) तर नागभीड नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीकरीता 1108 मतदारांनी (स्त्री – 529, पुरुष – 579 मतदार, एकूण टक्केवारी 39.49 ) मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. मतदानाची वेळ सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असून दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 62.82 टक्के मतदान झाले. सहा नगर पंचायतीच्या 82 आणि नागभीड नगर परिषदेच्या 1 अशा एकूण 83 प्रभागासाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी 94 मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा सहआयुक्त नगर परिषद प्रशासन यांनी दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !