अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धान पिकाचे मोठे नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - शेतकऱ्यांचे मागणी.



अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धान पिकाचे मोठे नुकसान.           

तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - शेतकऱ्यांचे मागणी.



एस.के.24 तास


मुल : मुल - सावली पूर्वीच्या संयुक्त तालुक्यात तलाठी साजातील अनेक गावे एकत्रित आहेत. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे मूल-सावली तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात नुकसान झाली असून कापनी केलेल्या धानाच्या सरड्या आलेल्या पाण्यात पोहत आहेत.आजच्या तारखेच्या ज्या अवस्थेत कापणी केलेले धान पीक पाण्यात पोहत आहेत अशाच वेळेत शासनाने तहसीलदार किंवा तालुका कृषी विभाग किंवा पंचायत समिती मधील कृषी विभागा कडून त्वरित लगेच प्रत्यक्ष मोका पाहणी करण्यात यावी. अन्यथा उशीरा पाहणी केली तर धानाच्या सरड्या पाण्यात डूबुन असल्याचे दिसणार नाही. आणि पाहणी करणारे म्हणतील की,शेतात पाणीच नाही. असे व्हायला नको अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांची आहे.

     आधीच अडचणीत असलेल्या व पीक कर्जाचा डोंगर असलेल्या शेतकऱ्याला या कठीण प्रसंगात आधार देण्याची  नितांत गरज असून प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ  आर्थिक मदत देण्यात यावी,कारण धान कापणी केलेल्या मजुरांचे पैसे शेतकऱ्याला तात्काळ देणे आहे. आणि तोंडात येणारा घासच निसर्गाने हिसकला आहे. मजुरांचे पैसे कुठून द्यायचे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. करिता शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी  अशी मागणी मान .उपविभागीय अधिकारी मुल ,तहसीलदार मुल-यांचेकडे  तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, यांचे नेतृत्वात 

    संजयगांधी निराधार समितीचे अध्यक्ष राकेशभाऊ रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार,  

 सामाजिक कार्यकर्ते धनराज रामटेके ,आदर्श सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, ओबीसी सेल कांग्रेसचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, राजगड येथील शेतकरी पाटील राजू पाटील मारकवार, उपसरपंच राहुल मुरकुटे, गुरु गुरनुले, विवेक मोहूर्ले, धनराज रामटेके,  विनोद गजेवर, कैलास चलाख, संदीप मोहबे, रणजित आकुलवर, किशोर पगडपल्लीवार,मारोती  तीवाडे, विनायक देशमुख, कोसंबी सरपंच रवींद्र कामडे, यांचेसह मुल,चिमढा, टेकाडी, नवेगाव,गडीसुरला,बेंबाळं, जानाला,आकापूर,तांदाळा, फिस्कृटी, नलेश्वर, हळदी, इत्यादी गावचे असंख्य शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थिती होते.





Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !