विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीला उमेदवारी देणार – खा.शरद पवार

 

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीला उमेदवारी देणार – खा.शरद पवार


एस.के.24 तास 


मुल : सत्तेच्या राजकारणात युतीसाठी वाटाघाटी अपरीहार्य असल्या तरी जिल्ह्यात पक्षाची स्थिती मजबुत करण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिल्ह्यात किमान एक जागा दिल्या जाईल. असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिले.

स्थानिक क्रिडा संकुलाच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यकर्ता, शेतकरी व कामगार मेळाव्यात खा.शरद पवार बोलत होते. माजी मंञी खा. प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मेळाव्यात खा. पवार यांनी कर्मवीर कन्नमवार यांच्या कार्याला उजाळा दिला. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिल्याची आठवण करून देतांना खा. पवार यांनी धान पिक घेणाऱ्या पुर्व विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. देशाची सुञे सांभाळणा-या लोकांच्या विचाराच्या मंडळींनी अमरावती मध्ये दंगल घडविल्याचा आरोप करतांना पवार यांनी सामाजिक एक्याला सुरूंग लावण्याचे काम करणाऱ्या मंडळीच्या हाती देश आणि राज्याची धुरा सोपवु नका असे आवाहन करतांना खा. पवार यांनी पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीचा फटका श्रीमंताना बसतो, या मताचा विरोध केला. पेट्रोल डिझेलची भाव वाढ इतर वस्तुच्या भाव वाढीस कारणीभुत ठरत असल्याने याचा फटका गरीबांनाही सोसावा लागतो. असे मत व्यक्त केले. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामूळे ओबीसींचे आरक्षण वाढवुन मिळाल्याचे सांगतांना पवार यांनी पक्ष सोडुन गेले या घटनेची चिंता न करता धिर आणि नेटाने कामाला लागा. पक्षाला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास दिला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना खा. प्रफुल पटेल यांनी राज्याचा विकास हेच पवार साहेबांचे ध्येय असुन राज्यात चवथ्या क्रमांकावर असतांना पहील्या क्रमाकांची भाषा बोलणा-या पक्षाच्या नेत्यांची दुकानदारी पवार साहेबांमूळे सुरू असल्याचे सांगीतले. कार्यकर्ते ही पक्षाची शक्ती असुन जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांनी एकनिष्ठ आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेवुन पक्षाची ताकद वाढवा. असे आवाहन केले. यावेळी जिल्ह्याचे संपर्क मंञी ना. प्राजक्त तनपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !